Kej Assembly Political News: केज विधानसभेत धनुष्यबाणाला बळ; माजी आ. संगीता ठोंबरे यांचा शिंदे गटात प्रवेश (फोटो-सोशल मीडिया)
Kej Assembly Political News: उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या केज विधानसभेच्या माजी आ. संगीता ठोंबरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शरद पवार गटाच्या पक्षाला धारशिव जिल्ह्यात खिंडर पडले असून केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. या शिंदे गटाच्या पक्षप्रवेशावेळी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासोबत माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे, अशोक संक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुलुक, अनिल जगताप, माजी आ. ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: Latur Panchayat Samiti Election 2026: पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी; उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू
शिवसेनेची उभारणी अधिक मजबूत होणार असल्याची ही सकारात्मक चिन्हे आहेत. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बीड जिल्ह्यात शिवसेनेसोबत जोडले गेलेले हे पहिले माजी आमदार असल्याचे सांगितले. माजी आ. संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेना पक्षाची उभारणी अधिक मजबूत होईल आणि त्या पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे केज मतदारसंघात शिवसेना पक्षाची उभारणी अधिक मजबूत होईल आणि त्या पक्षवाढीसाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा: Latur Municipal Election Result 2026 : अमित देशमुखांनी भाजपा दिग्गजांना पाणी पाजले; लातूर महापालिकेवर एकहाती तिरंगा फडकला
माजी आमदार संगीता ठोंबरे यांचा त्यांच्या भागात जनसंपर्क अधिक असल्याने आणि त्यांचा समर्थकवर्ग जास्त असल्याने याचा निश्चित फायदा शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाला येत्या आगामी निवडणुकीच्या काळात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीड जिल्हयाचे जिल्हा परिषदेचे पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






