Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळीज पिळवटून टाकणारी घटना! एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील खामगाव येथे विद्युत वायरमधील प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंब संपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 08, 2026 | 05:06 PM
एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • काळीज पिळवटून टाकणारी घटना!
  • एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील ४ जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू
सातारा दि ८ प्रतिनिधी: फलटण तालुक्यातील खामगाव येथे घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमधील प्रवाहामुळे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगाव परिसरासह संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

किसन पिसुरड्या शिंदे (वय ४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) अशी एकाच वेळी मृत्यू पावलेल्या दुर्दैवी कुटुंबीयांची नावे आहेत.

खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील प्रमुख किसन शिंदे हे घराबाहेर जात होते. मात्र, घराबाहेर एका विद्युत वायरमधून उतरलेल्या वीजप्रवाहाला अंधारात किंवा नजरचुकीने किसन यांचा या वायरला स्पर्श झाला आणि त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

किसन शिंदे यांना विजेचा धक्का लागून ते विव्हळत असल्याचे पाहताच, त्यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई, मुलगा सचिन आणि मुलगी आरती हे एकापाठोपाठ एक धावून आले. मात्र, वीजप्रवाह इतका तीव्र होता की, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चौघेही एकमेकांना चिकटले. काही सेकंदांतच या संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुर्दैवी अंत झाला.

या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी महादेव पिसे, ओंबासे आणि अडसूळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.

घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह नेमका कसा आणि कुठून आला? महावितरणचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे का? या सर्व बाजूंचा सखोल तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. एकाच घरातील चार जण अचानक गेल्याने गावात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Jawali Landslide News: जावळी तालुक्यातील सायघरमध्ये घरावर कोसळली दरड! धनावडे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर, मोठी जीवितहानी टळली

Web Title: Four members of the same family died instantly from electric shock while trying to save each other

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Accident
  • Electric Shock
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
1

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
2

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
3

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!
4

Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.