मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची सांस्कृतिक ओळख असणारा गणेशोत्सव हा गेली २ वर्षे ‘कोविड – १९’ (Corona) या साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन आपण साजरा केला. या दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वेळोवेळी केलेल्या सुचनांना मुंबईकर नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. यंदा आपण हा उत्सव अधिक उत्साहाने साजरा करणार आहोत.
[read_also content=”विधानपरिषद विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेनेचे अंबादास दानवेंकडून अर्ज दाखल https://www.navarashtra.com/maharashtra/for-leader-of-opposition-legislative-council-application-of-ambadas-danve-313634.html”]
दरम्यान, या उत्सावाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी दिल्या जाणा-या सुचनांचे आपण अधिकधिक काटेकोरपणे पालन करावे आणि यंदाचा श्रीगणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल (Iqbal singh chawal) यांनी आज संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सव समन्वय बैठकीदरम्यान सर्व संबंधितांना केले.