Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण; नागलाबंदर भागात पुन्हा आंदोलन

पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 16, 2025 | 09:46 PM
घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण (Photo Credit- X)

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण
  • नागलाबंदर भागात पुन्हा आंदोलन
  • अनेक नोकरदारांना कामावर पोहोचण्यास उशीर
ठाणे/स्नेहा जाधव काकडे: घोडबंदर येथे वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असताना मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा नागलाबंदर भागात नागरिकांनी एकत्र जमून आंदोलन केले. आंदोलकांनी काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतुक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती देखील वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीचा भार घोडबंदर मार्गावर आला आहे. मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाधीन कामे सुरु असल्याने कोंडीत भर पडते.

वाहतुक कोंडीविषयी अनेक तक्रारी करुनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी सकाळी आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा एकदा घोडबंदरमधील काही रहिवाशांनी एकत्र येऊन घोडबंदर येथील नागलाबंदर परिसरात आंदोलन केले. येथील वाहतुक पोलिसांच्या चौकीजवळ आंदोलन करण्यात आले.

Thane News : वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा; एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश

काही आंदोलकांनी रस्तामध्ये येऊन काहीवेळासाठी रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा आंदोलक एका बाजूला उभे राहिले. प्रशासनापर्यंत नागरिकांचा आवाज पोहचविण्यासाठी हे आंदोलन केल्याचे आंदोलकांनी सांगितले. खड्डे, वाहतुक कोंडीची समस्या यासाठी हे आंदोलन सुरु आहे.

समस्या काय?

घोडबंदर भागात वारंवार होणारी वाहतुक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. यावर काहीतरी तोडगा काढण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे. घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.

दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करताना आणि तेथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो. या वाहतुक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही.

Web Title: Ghodbunder road traffic jam potholes trouble citizens nagalabandar protest again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • thane
  • Thane news
  • Traffic News

संबंधित बातम्या

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम
1

ठाणे जिल्ह्यात न्यू कळवा हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती दिंडीद्वारे जनजागृती; नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा ठाणे उपक्रम

Ashadhi Ekadashi 2026: ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह; विठ्ठल मंदिरांत विशेष पूजा, सुरक्षा व्यवस्था सज्ज
2

Ashadhi Ekadashi 2026: ठाणे जिल्ह्यात आषाढी एकादशीचा उत्साह; विठ्ठल मंदिरांत विशेष पूजा, सुरक्षा व्यवस्था सज्ज

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल
3

केडीएमसी महासभेतील गदारोळानंतर मनसे-भाजप आमनेसामने; ‘सत्तेसाठी भाजपा लाचार, अभिमान असेल तर…’ मनसेकडून भाजपावर हल्लाबोल

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य
4

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.