Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती

घोडबंदर येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रकल्पाला गती देण्याबाबत चर्चा झाली .

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 09, 2026 | 04:37 PM
घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती

घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती

Follow Us
Follow Us:
  • घोडबंदरच्या ‘शिवसृष्टी’ला अखेर वेग
  • मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी माहिती
  • ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास मंजुरी दिली
मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या घोडबंदर येथील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन सचिव संजय खंदारे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

St Mahamandal : आता काय खैर नाही! एसटी स्थानकांभोवती अवैध प्रवासी वाहतुकीवर राज्यव्यापी धडक; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून घोडबंदर किल्ला व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. घोडबंदर किल्ला, खाडी किनारा , त्या बाजूला स्काय वॉक अशा विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. घोडबंदर किल्ला परिसराचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने घोडबंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ‘शिवसृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत सुमारे ५० कोटी रुपये खर्चाच्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास मंजुरी दिली होती. या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ७५ टक्के निधी पर्यटन विभागामार्फत आणि उर्वरित २५ टक्के निधी संबंधित

महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय उच्चस्तरीय समितीने घेतला होता. मात्र, निर्णयप्रक्रिया आणि अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता राहावी तसेच प्रकल्पाचे काम अधिक वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी संपूर्ण खर्च पर्यटन विभागानेच करावा, अशी विनंती मी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. त्यानुसार घोडबंदर येथे उभारण्यात येणाऱ्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचा संपूर्ण खर्च पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) करण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळणार असून तो लवकर पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी उपस्थित अधिकारी तसेच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रकल्पाला दिलेल्या सहकार्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले.

ST Employees: आर्थिक संकटात लालपरी! ७ हजार कोटींच्या थकबाकीतून बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईकांकडे साकडे

Web Title: Ghodbunder shivsrishti project mtdc pratap sarnaik update news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्राच्या दिशेने येतंय वादळी संकट; कोकण, मुंबई अन्…; अलर्टने चिंता वाढली
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्राच्या दिशेने येतंय वादळी संकट; कोकण, मुंबई अन्…; अलर्टने चिंता वाढली

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा
2

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
3

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
4

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.