Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

गोंदिया जिल्हा परिषदेने सौंदड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची सात दिवसांत चौकशी करण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही तब्बल ५० दिवस उलटून चौकशी सुरू झालेली नाही. या प्रशासकीय अकार्यक्षमतेमुळे ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत असून वरिष्ठांनी तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 28, 2026 | 04:02 PM
जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
Follow Us
Follow Us:
  • सौंदड ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराची ७ दिवसांत चौकशी करण्याचे गोंदिया जिल्हा परिषदेचे आदेश होते.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पष्ट निर्देशानंतरही ५० दिवस उलटून गेले तरी चौकशीला सुरुवातच झालेली नाही.
  • उपसरपंच रोशन शिवणकर यांनी वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली.

सौंदड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेतील अनियमितता तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील तक्रारींच्या चौकशीसंदर्भात जिल्हा परिषद गोंदियाकडून वारंवार आदेश देण्यात येत असतानाही पंचायत समिती स्तरावर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद गोंदियाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी ६ जूनच्या आदेश काढून संबंधित अधिकाऱ्यांना सात दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून मुद्यनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आदेशानंतर ५० दिवस उलटूनही चौकशीला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या गंभीर अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४० अन्वये सखोल चौकशी करून संबंधित दस्तऐवजांची पडताळणी करत जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तथापि, आदेशानंतर पंचायत समिती स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने ग्रामस्थ आणि तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश असताना ५० दिवस उलटूनही चौकशीच सुरू झाली नाही. मग अहवाल नेमका कधी आणि कसा सादर होणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला.

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

अंमलबजावणी मात्र शून्य

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, हे एकमेव प्रकरण नसून यापूर्वीही १० एप्रिल, २८ एप्रिल, ११ ११ मे २०२६ तसेच इतर तारखांना सौंदड ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेसंदर्भात वरिष्ठ स्तरावरून चौकशी व कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते. काही आदेशांमध्ये विविध विकासकामे, निविदा प्रक्रिया आणि नागरी सुविधा योजनांतील कथित नियमभंगाची चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आले होते. मात्र, या आदेशांच्या अंमलबजावणीतही विलंब झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पंचायत समिती स्तरावरील विलंबाची दखल घेऊन कारणमीमांसा करणार का, तसेच आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सौंदड ग्रामपंचायतमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत वारंवार तक्रारी करूनही गटविकास अधिकारी मे रोती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार सादर केली असून सौंदड ग्रामपंचायत कार्यालयाची वरिष्ठ स्तरावरून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. असे रोशन शिवणकर उपसरपंच ग्रा. प. सौंदड यांनी सांगितले आहे.

Web Title: Gondia zp order ignored soundad gram panchayat inquiry delayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra

संबंधित बातम्या

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
1

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
2

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी
3

Amravati News: शेतात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ! शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; वनविभागाकडे पंचनाम्यासह भरपाईची मागणी

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना
4

प्रवाशाचा धक्कादायक कारनामा! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग ओढले अन्…; लातुरातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.