भारतात सोन्याची खरेदी केवळ गुंतवणूकसाठी नाहीतर विविध सणसमारंभासाठी केली जाते. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे वाढते दर पाहता सोनं खरेदी करावे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. आज देखील सोनं आणि चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. तुम्ही जर आज सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे दर नक्की तपासा…
सोनं एक लाखाचा टप्पा पार करणार?
सोनं आणि चांदीचे वाढते दर पाहता, सोनं लवकरच एक लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. सोनं आणि चांदीची सध्याचा वेगवान दरवाढ पाहता 2024 च्या अखेरीस किंमत 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल असे संकेत दिले जात आहेत. दरम्यान अमेरिकन डॉलरच्या दर आणि यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये सतत वाढ होत असताना सोन्याच्या किमतीने सलग चौथ्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 75 हजार 120 आहे. तर एक किलो चांदी विकत घेण्यासाठी 95,480 रुपये मोजावे लागणार आहे.
[read_also content=”अखेर प्रतिक्षा संपली, Bigg Boss Marathi चा ५ वा सीझन नवा होस्ट रितेश देशमुख करणार धमाका! https://www.navarashtra.com/movies/riteish-deshmukh-to-host-bigg-boss-marathi-season-5-instead-of-mahesh-manjrekar-535957.html”]
दरवाढीचं कारण काय?
इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे मध्य-पूर्वी आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर सोनं आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच सोन्यातील किंमतीच्या वाढीमधील एक कारण म्हणजे अमेरिकेतील चलनवाढीमधील नरमाई आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात घट करण्याचे सूतोवाच केले आहेत. दरम्यान अमेरिकेत महागाई संदर्भात एप्रिलमधील आकडे समोर आले आहेत. हे आकडे सकारात्मक असल्यामुळे त्यामुळेच सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये दरात घट करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यावर दाव खेळला आहे.
महाराष्ट्रातील सोन्याचे दर