(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
चित्रपटामधील अनेक रहस्य ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. कलाकारांचा दमदार अभिनय, दिग्दर्शकाचे उत्तम दिग्दर्शन, शूट करण्यात डीओपीने कसलीही न सोडलेली कमतरता, जबरदस्त आणि रोमँटिक टच असलेल्या संगीताची जादू या सगळ्या गोष्टींनी ट्रेलरमधूनच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीला जोडणारा धागा आहे. कारण यांत निर्माते ते अगदी कलाकार हे कन्नड आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील दिग्गज आहेत. आणि प्रेक्षकांसाठी हा संगम पर्वणीचं ठरणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
ट्रेलरनंतर येत्या २८ नोव्हेंबरला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र दिग्दर्शित ‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटात अभिनेता कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके यांच्यासह चित्रपटात प्रसाद खांडेकर, अश्विनी चवरे, शलाका पवार, रुक्मिणी सुतार ही कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ही कथा नक्षलवादी पार्श्वभूमीवर आधारित आहे. ट्रेलरमधील सीन पाहता चित्रपटातील लोकेशन्स नक्षलवादी भागांत शूट झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. ट्रेलरमधील लक्षणीय बाब म्हणजे संगीत. ‘आफ्टर ओ.एल.सी’मध्ये मराठी गीतकार क्षितिज पटवर्धन आणि मंदार चोळकर यांनी गीतकार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहित राऊत, आनंदी जोशी, आर्या आंबेकर, अभय जोधपुरकर यांनी पार्श्वगायनाची धुरा सांभाळली आहे.
विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी सांभाळली असून ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत निर्मिती केली आहे. येत्या २८ नोव्हेंबरला ‘आफ्टर ओ.एल.सी’ हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना पाहता येणार आहे.






