Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६३६ शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्गखोल्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींची गरज असताना पुरेशा निधीअभावी ही कामे रखडली असून पालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 02, 2026 | 05:20 PM
Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Follow Us
Follow Us:
  • गोंदिया जिल्ह्यातील ६३६ जिल्हा परिषद शाळांच्या जीर्ण इमारतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
  • शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३० कोटींची गरज असताना निधी अद्याप अप्राप्त असल्याने प्रत्यक्ष कामे रखडलेली आहेत.
  • गोरेगाव तालुक्यातील मंगरडोह येथे स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायत वाचनालयात बसवून शिक्षण दिले जात आहे.

एकीकडे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील जवळपास ६३६ शाळा जीर्ण असून, पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०३३ प्राथमिक शाळा असून, नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात शाळा प्रवेशोत्सव पार पडला. मात्र, जीर्ण शाळांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चालू वर्षांतच गोरेगाव तालुक्यातील ग्राम मंगरडोह येथील जि.प. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळू लागले. त्यामुळे येथील शालेय मुलांचा जीव वाचविण्यासाठी ग्राम पंचायतीच्या वाचनालयात वर्ग भरविले जात आहेत.

NEET Paper: ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तडजोड नाही’; कोर्टाचे सरकारला खडे बोल, NEET परीक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोकादायक शाळेत शिकायला मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मागणी करण्यात आली आहे. फक्त शाळा धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो.

वर्गखोल्यांना त्वरित दुरुस्तीची गरज

जिल्ह्यातील जि.प. शाळांच्या वर्गखोल्या व शाळा बांधकामासाठी ९ कोटी २५ लाख निधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र, दुरुस्तीसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. यंदा या वर्गखोल्यांसाठी अद्याप निधी अप्राप्त आहे. त्यामुळे वर्गखोल्यांची दुरुस्ती व बांधकामे रखडली आहेत.

आंदोलनानंतर नवा वाद; सरकारच्या आश्वासनानंतरही अटकसत्र सुरूच, विद्यार्थ्यांना विश्वासघाताची भीती

जिल्ह्यातील जीर्ण वर्गखोल्यांसाठी ५ कोटी २५ लाख रुपये तर इमारत बांधकामासाठी ८.३५ लाखाची गरज आहे. मात्र, अद्याप निधी प्राप्त झाला नाही. निधी प्राप्त होताच दिवाळीपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. असे गोविंद बघेले, अभियंता समग्र शिक्षा अभियान यांनी सांगितले आहे.

शाळांच्या वर्गखोल्या व काही शाळांच्य शाळांच्या इमारती धोकादायक आहेत, ही ही बाब खरी आहे. शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीची त्वरित पूर्तता करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री नाईक यांना शुक्रवारीच साकडे घातले. लवकरच निधी प्राप्त होईल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अखर्चित निधी शाळांसाठी मिळावा, यासाठीही प्रयत्न करण्यात आले असून, त्यासाठी पालकमंत्र्यांनी होकार दिला आहे. असे स्पष्टीकरण सुरेश हषे, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती, जि.प. गोंदिया यांनी दिले आहे.

Web Title: Gondia zp school dilapidated buildings repair fund delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Schools

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.