Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षा यामुळं या निवडणुका लगेच होण्याची शक्यता नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 02:25 PM
ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज, राज्य शासनाकडून परवानगी; सांगली जिल्ह्यातील 155 गावच्या निवडणुका लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:
  • ग्रामपंचायतीवर येणार प्रशासनराज
  • राज्य शासनाकडून परवानगी
  • सांगली जिल्ह्यातील गावच्या निवडणुका लांबणीवर
सांगली : सांगली जिल्ह्यातील १५५ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षा यामुळं या निवडणुका लगेच होण्याची शक्यता नाही. त्यामुळं सांगली जिल्ह्यातील सुमारे १५५ ग्रामपंचायतींवर प्रशासनराज येणार आहे, पुढील काही दिवस आता गावचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

या ग्रामपंचायतींना निवडणुकांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निवडणुकांचीही तयारी आयोगाला करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या, ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहेत, मात्र त्यानंतर दिनांक १० फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षा होत आहेत. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही लांबणार आहेत. तेथे प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

फेब्रुवारीमध्ये मुदत संपत असलेल्या बहुतांश ग्रामपंचायती मोठ्या लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तेथे निवडणुकीसाठी यंत्रणाही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. तेथील ग्रामपंचायत अधिकारी किंवा पंचायत समितीतील विस्ताराधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नियुक्त्या मिळणार आहेत. सर्व परीक्षांचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे मतदान केंद्रांसाठी शाळा, महाविद्यालये उपलब्ध होणार नाहीत. या स्थितीत परीक्षा संपल्यावर व पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका उरकाव्या लागणार आहेत. अन्यथा, पावसाळा संपेपर्यंत म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबरशिवाय वेळ मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

सर्वाधिक ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात

फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या सर्वाधिक म्हणजे ३९ ग्रामपंचायती तासगाव तालुक्यात आहेत. त्या खालोखाल मिरजमध्ये १७, खानापुरात १३ ग्रामपंचायती आहेत. आणि वाळवा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे प्रत्येकी २ ग्रामपंचायतींची मदत फेब्रवारीत संपत आहे.

हे सुद्धा वाचा : प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार बजेट; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू

अशा आहेत ग्रामपंचायती

मिरज १७, अप्पर सांगली – ९, जत – २९, कवठेमहांकाळ – ११, तासगाव ३९, खानापूर १३, आटपाडी – १०, पलूस – १४, कडेगाव – ९, शिराळा – २, वाळवा – २

Web Title: Gram panchayat elections in sangli district are unlikely to be held soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Election News
  • grampanchayat election result
  • sangli news

संबंधित बातम्या

मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट; सदस्य पांडुरंग इंगळे प्रकरणानंतर बुधगाव बंदची हाक
1

मिरज पंचायत समिती निवडीवर ‘अपहरण’चे सावट; सदस्य पांडुरंग इंगळे प्रकरणानंतर बुधगाव बंदची हाक

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा
2

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले
3

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई
4

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेचे १४ कर्मचारी निलंबित, वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न कल्याने सीईओ नरवाडे यांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.