• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ajit Pawars Ncp Will Get The Post Of Leader Of Opposition In Pune Municipal Corporation

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील ‘ही’ दोन नावे चर्चेत

पुणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2026 | 12:00 PM
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग! राष्ट्रवादीतील 'ही' दोन नावे चर्चेत

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विरोधी पक्षनेतेपदासाठी लागली फिल्डिंग!
  • राष्ट्रवादीतील दोन नावे चर्चेत
  • चांदेरे अन् निकम यांची नावे चर्चेत
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यांचाच महापाैर हाेणार असून, विराेधी पक्षनेत्याची माळ ही राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये काेणाच्या गळ्यात पडणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ११९ जागांवर निर्विवाद विजय मिळवत स्पष्ट वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे सहाजिकच महापौरपद भाजपकडे जाणार हे आता निश्चित मानले जात आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापौर निवडणूक पार पडणार असून, त्याचवेळी महापालिकेतील इतर महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर विशेषतः विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महापालिकेच्या सध्याच्या संख्याबळाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २७ नगरसेवकांसह सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरतो. काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) केवळ ३ जागांवर मर्यादित राहिला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी अजित पवार गट आणि शरद पवार गट युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यामुळे हे दोन्ही गट सभागृहात एकत्र राहतील, अशी चर्चा आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एकमेव नगरसेवक सभागृहात असणार आहे. या सर्व राजकीय समीकरणांचा विचार करता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, राज्याच्या सत्तेत भाजप आणि अजित पवार गट एकत्र असल्याने प्रत्यक्ष विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका काँग्रेसलाच निभवावी लागणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद जरी राष्ट्रवादीकडे गेले, तरी प्रत्यक्षात विरोधी सूर किती तीव्र राहील, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, अजित पवार गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी दोन प्रमुख नावे चर्चेत आहेत. यामध्ये अनुभवी आणि सभागृहाच्या कामकाजाची सखोल माहिती असलेले नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे नाव आघाडीवर आहे. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, सभागृहातील दीर्घ अनुभव आणि आक्रमक शैली ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. भाजपच्या प्रचंड संख्याबळासमोर विरोधी पक्षाने ठाम आणि आक्रमक भूमिका घ्यावी लागणार असल्याने चांदेरे यांचा अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, नगरसेवक निलेश निकम यांचे नावही चर्चेत आहे. पाचव्यांदा महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून काम पाहणारे निकम हे अनुभवी चेहरा आहेत. त्यांचा स्वभाव तुलनेने शांत आणि संयमी असल्याची ओळख आहे. मात्र, दीर्घ अनुभव आणि कामकाजातील सुस्पष्टता यामुळे
तेही पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानले जात आहेत. भाजपच्या ११९ जागांच्या भक्कम संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेता आक्रमक असावा, अशी अपेक्षा असली तरी, सभागृहातील सुसंवाद आणि मुद्देसूद मांडणीही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Ajit pawars ncp will get the post of leader of opposition in pune municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • BJP
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…
1

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…
2

ठाकरेंच्या शिवसेनेच्या भुमिकेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा सवाल, म्हणाले; आता आम्ही परभणीत…

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले
3

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?
4

Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

Feb 11, 2026 | 09:10 AM
Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धि योगाचा मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धि योगाचा मिथुन आणि तूळ राशीसह या राशीच्या लोकांना होईल फायदा

Feb 11, 2026 | 09:00 AM
Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी… गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी… गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

Feb 11, 2026 | 08:53 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 11, 2026 | 08:47 AM
शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

शरीरातील प्रत्येक नस होईल स्वच्छ! हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी नियमित खा ‘ही’ लाल फळे, हृदय राहील निरोगी

Feb 11, 2026 | 08:35 AM
Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ;  विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

Women and Girls in Science Day : प्रयोगशाळेपासून अंतराळापर्यंत… ; विज्ञानविश्वात महिलांची दमदार झेप

Feb 11, 2026 | 08:34 AM
7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज

7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज

Feb 11, 2026 | 08:34 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.