Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी अधिक गतीने करावी – संदिपान भुमरे

मंत्री भुमरे म्हणाले की, ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामसेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सोपविण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीने करावीत. इतर राज्यात ज्याप्रमाणे उपलब्ध निधी पूर्ण खर्च होईल अशा पद्धतीने कामे करतात त्याप्रमाणे आपल्या राज्यातील कामे करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 30, 2022 | 08:06 PM
रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी अधिक गतीने करावी – संदिपान भुमरे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

रोहयो मंत्री भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी ग्रामसेवक संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय बनसोड, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के.पी.मोते,परिमल सिंह यांच्यासह रोहयो आणि फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुमरे म्हणाले की, ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामसेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सोपविण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीने करावीत. इतर राज्यात ज्याप्रमाणे उपलब्ध निधी पूर्ण खर्च होईल अशा पद्धतीने कामे करतात त्याप्रमाणे आपल्या राज्यातील कामे करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आणि सर्व कामगारांच्या हजेरीपत्रकावरील प्रतिस्वाक्षरी करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यात अधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी खाजगी आधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात यावा. फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षितता, शेतकऱ्यांना होणारा फायदा – तोटा आदी अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री भुमरे यांनी दिले.

Web Title: Gram sevaks should speed up the work of employment guarantee scheme sandipan bhumre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2022 | 08:06 PM

Topics:  

  • BJP
  • Nationalist Congress Party
  • sandipan bhumre
  • shivsena

संबंधित बातम्या

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
1

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
2

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
3

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक
4

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही; शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीदिनी संजय शिरसाट भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.