नांदेड वाघाळा महापालिकामध्ये गटबाजी स्वीकृत नगरसेविकांसाठी देखील आवडीची लोकं घेण्यात आल्याचा आरोप (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : मनपातील सत्तास्थापनेनंतर भाजपात सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता उघडपणे समोर येऊ लागली असून, अलीकडील पदनियुक्त्यांनी पक्षातील “गृहकलह” अधिक तीव्र झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. मनपा निवडणुकीदरम्यान निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही, ही भावना आधीपासूनच कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यातच अनेकांनी नाराजीपोटी इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवली, मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने आता ते पुन्हा ‘घरवापसी’च्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापौर पदासाठी शांभवी प्रविण साले यांचे नाव जोरदार चर्चेत असताना, ऐनवेळी कविता संतोष मुळे यांची निवड झाली. (Nanded News)
निवडीमध्येही चव्हाण समर्थकांनाच प्राधान्य
त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीमध्येही ‘चव्हाण समर्थकां’नाच प्राधान्य दिल्याचा आरोप होत आहे. दिलीप कंदकुर्ते, अमित तेहरा, डॉ. अंकुश देवसरकर, आशुतोष जोशी आणि सुप्रिया संजय रातोळीकर या नावांमुळे गटबाजी अधिक ठळक झाल्याचे बोलले जात आहे. स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या पदांवरही हाच पॅटर्न कायम राहिल्याचे दिसते. शांभवी साले यांची स्थायी समिती व महिला, बालकल्याण समितीमध्ये सदस्य म्हणून निवड न करणयाची दक्षता पद्धतशीरपणे घेण्यात आल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : “निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही हवे होता…; अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट
अनेकांच्या पदरी आली निराशा
स्थायी समिती सभापतीपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असून ऐनवेळी वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांची निवड करण्यात आली महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभाप निवडीत हाच पॅटर्न कायम ठेवत नवख्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला आहे. विशेष म्हणजे, भाजपासाठी दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या साले कुटुंबाला वारंवार डावलले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. माजी महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी ‘चिखलीक समर्थक’ म्हणून काम केल्यामुळेच त्यांना बाजूला ठेवले जा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमा ज्योती किशन कल्याणकर, वैशाली मिलिंद देशमुख, संजा घोगरे, यांसारख्या जुन्या नगरसेवकांनाही दूर ठेवले जा असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : रूपाली चाकणकरांचा पाय खोलात? Ashok Kharat प्रकरणात थेट…
राजकीय वर्तुळात चर्चा
दरम्यान, या सर्व घडामोडीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे. ‘निष्ठा की गटबाजी? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात असून, पक्षातील निर्णयप्रक्रिया काही मोजक्या नेत्यांपुरती मर्यादित झाल्याची टीका होत आहे. पदनियुक्त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते, अशीही भीती व्यक्त होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत संधर्ष अधिक तीव्र झाल्यास, भाजपाच्या संघटनात्मक ताकदीलाच तडा जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकूणच, मनपा पदनियुक्त्यामधून भाजपातील गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष उघडकीस येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.






