Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसचे पाच शहरात महापौर, राज्यातील नगरसेवकांची संख्या…; हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती

पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 06:27 PM
काँग्रेसचे पाच शहरात महापौर, राज्यातील नगरसेवकांची संख्या...; हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती

काँग्रेसचे पाच शहरात महापौर, राज्यातील नगरसेवकांची संख्या...; हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसचे पाच शहरात महापौर
  • १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ
  • हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती
बुलढाणा : महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ असे चित्र आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संक्रातीच्या पर्वावर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. जेथे शक्य आहे तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षाने वैचारिक व संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली. सत्ताधारी भाजपा महायुतीने पैशाचा प्रचंड वापर केला, बोगस मतदान झाले, कुठलीही तडजोड न करता भाजपाच्या बुलडोझरसमोर काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने उभा राहिला. हा कार्यकर्त्यांचा विजय असून लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा सार्थ अभिमान आहे, विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. हा काळ संघर्षाचा, वैचारिक लढाईचा आहे आणि काँग्रेस ही लढाई लढण्यास कटीबद्ध आहे. अपशाने खचून न जाता पुढच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले

मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे

मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्रि अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले. हुकमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे. पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे, असा इशारा सपकाळ यांनी दिला. भाजपाच्या विजयाचे वर्णन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “करुन घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते सत्तेचा फेटा”.

Web Title: Harshvardhan sapkal has reacted to the results of the municipal elections in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन
1

“महाराष्ट्राचे आभार, अहोरात्र परिश्रम करणाऱ्या…”; PM Narendra Modi यांनी केले महायुतीचे अभिनंदन

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी
2

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

Municipal Election Result 2026: “हा तर मोदींच्या विकासनीतीवर…”, राज्यातील महाविजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया
3

Municipal Election Result 2026: “हा तर मोदींच्या विकासनीतीवर…”, राज्यातील महाविजयानंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया

ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
4

ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.