Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्या’ अहवालावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला सवाल, म्हणाले; आता तरी फडणवीस…

सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे आता पुढे आले आहे. यावरुन आता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला सवाल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2025 | 05:09 PM
Congress state president Harshvardhan Sapkal criticizes BJP over Sougat A Modi

Congress state president Harshvardhan Sapkal criticizes BJP over Sougat A Modi

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. ‘परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली,’ असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीअंती ठेवला आहे. हा ४५१ पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आयोगानेही गुरुवारी त्याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. यावरुन आता काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला सवाल केला आहे.

परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला, असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी यांचा मृत्यू मारहणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे. आता तरी फडणवीस सरकार जागे होऊन संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करणार आहे? का असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश सपकाळ यांनी विचारला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलीसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला, त्यात अनेकांना जबर मारहाण झाली, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन त्यांना बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला पण सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली.

परभणीमध्ये कोंबिंग ऑपरेशन व लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला. मंत्रालयातून दिला, का पोलीस महासंचालक कार्यालयातून दिला याची चौकशी झाली पाहिजे. गृहमंत्री व मुख्यमंत्री नात्याने फडणवीस हे परभणीचे प्रकरण हाताळण्यात सपशेल फेल झाले आहेत. एका दलित तरुणाचा पोलिस मारहाणीत मृत्यू होतो पण सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही यातून भाजपा युतीचे सरकार दलित विरोधी आहे हे स्पष्ट दिसते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीला येऊन सुर्यवंशी यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस पक्ष सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करेल, असेही सपकाळ म्हणाले.

Web Title: Harshvardhan sapkal questions government over somnath suryavanshis death report nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • Congress
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Parbhani Case
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.