Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात पावसाचा हाहा:कार; गोंदिया, वर्धासह अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत, डझनभर गावांचा संपर्क तुटला

कामठी शहरातील रामनगर रेल्वे क्रॉसिंगवर बांधलेला नवीन उड्डाणपुल मार्ग सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या मार्गावर वाहतूक अद्याप सुरू झालेली नव्हती. अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसात रस्ता उडून गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2025 | 07:10 AM
विदर्भात मुसळधार, नागपुरात कहर

विदर्भात मुसळधार, नागपुरात कहर

Follow Us
Follow Us:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही प्रतिक्षाच आहे. असे असताना आता पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूल आणि रस्ते कोसळले आहेत. तर डझनभर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नागपूरच्या कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यात आलेल्या पुरात 2 जण वाहून गेले आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. दुसरीकडे, कामठी तालुक्यातील नाग नदीकाठच्या वस्त्यांमध्ये अडकलेल्या 70 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

काही भागातील वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी साचल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला. तर वर्धा जिल्ह्यात 24 तासांत 50 महसूल विभागात मुसळधार पाऊस नोंदला गेला. मुसळधार पावसामुळे 26 मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर काही गावांमध्ये अडकलेल्या 4 कामगारांना बचाव पथकांनी सुखरूप बाहेर काढले. दिवसभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

उड्डाणपुल सुरू होण्यापूर्वीच कोसळला

कामठी शहरातील रामनगर रेल्वे क्रॉसिंगवर बांधलेला नवीन उड्डाणपुल मार्ग सुरू होण्यापूर्वीच कोसळला. या मार्गावर वाहतूक अद्याप सुरू झालेली नव्हती. अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसात रस्ता उडून गेला. दोन ठिकाणी रस्ता कोसळला आणि मोठे खड्डे पडले.

चंद्रपुरात वाहतूक ठप्प

चंद्रपूर जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. पूल आणि रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. ब्रहापुरीत एक विहीर कोसळली, सावलीतील नागभीडमध्ये घरे कोसळली. ब्रह्मपुरीत 11 जणांना शाळेत हलवण्यात आले.

Web Title: Heavy rain in many districts of vidarbha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • Climate Change
  • Heavy Rain
  • Maharashtra Rain
  • Nagpur Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…
1

राज्यातील वातावरणात होतोय बदल; पुण्यात उन्हाचा वाढला चटका, सप्टेंबर कोरडा पण ऑक्टोबर…

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर
2

Palghar Storm Rain : पालघरला वादळी पावसाचा मोठा फटका! घरांची पडझड, झाडे अन् वीजखांब कोसळले; संसार उघड्यावर

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता
3

ऑक्टोबर सुरु होताच अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पूर्व भारतातील भागांत गारपीटीचीही शक्यता

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
4

राज्यात पावसाचा मुक्काम आणखी वाढणार; पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.