Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका; गारपिटीमुळे रब्बीतील गहू, मका पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 20, 2026 | 11:00 AM
विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका

Follow Us
Follow Us:

नागपूर : विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि गोंदियासह अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. परिणामी, अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपासूनच अनेक ठिकाणी वातावरणात बदल जाणवत होता. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी सुरुवातीला पाऊस व गारपीठ सुरू झाली. चांदूर रेल्वे येथे वीज कोसळली. हवामान विभागातर्फे विदर्भात पुढील काही दिवस अवकाळी पाऊस व गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे.

रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे वडाळी देशमुख, सावरा, रंभापुर, वडनेर, कालवाडी, आसेगाव आधी गावांमध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा गहू, हरभरा या पिकांसह आंब्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव येथे अवकाळी पावसादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील संत लखमाजी महाराज संस्थानच्या सुमारे ४०० वर्षांच्या परंपरेला लाभलेल्या गुढीपाडवा यात्रेवर यंदा जोरदार गारपिटीने अक्षरशः घाला घातला. यामुळे हजारो भाविकांचा हिरमोड झाला असून, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य प्रदेश, इंदूर, गुजरात, सूरत, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अनेक भाविकांचा ‘रोडग्यांचा’ (नैवेद्य) कार्यक्रम सुरू असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने मंदिर परिसरात चिखल झाला.

ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात बुधवारी गारपीटासह अवकाळी सरी बरसल्या. त्यामुळे ज्वारीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव परिसरात ऐन कापणीच्या तोंडाशी आलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गुरुवारी गुढी पाडव्याच्या सणाआधीच शेतकऱ्यांवर संकट कोसळल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या अपेक्षेने घेतलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीचा आढावा स्थानिक पातळीवर घेतला जात असून, मदतीची मागणी होत आहे.

हेदेखील वाचा : Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप

Web Title: Heavy rains lash several parts of vidarbha know what exactly happaned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Agricultural Crops
  • Nagpur News
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले
1

Nagpur News : झोनवाढीवरून सभागृहात ‘भारत माता’ विरुद्ध ‘जय संविधान’; घोषणांनी वातावरण तापले

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…
2

कामाच्या शोधात आलेल्या तरुणाची आत्महत्या; ट्रकखाली येऊन उडी मारली अन्…

Nagpur News : नागपूरच्या ग्रँडमास्टरची ऐतिहासिक कामगिरी ;रौनक ठरला शेल्डेमोंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता !
3

Nagpur News : नागपूरच्या ग्रँडमास्टरची ऐतिहासिक कामगिरी ;रौनक ठरला शेल्डेमोंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विजेता !

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !
4

Nagpur : दूध ,खाद्यतेल आणि मसाल्यांमध्ये मोठी भेसळ ; ३.४० कोटींहून जास्त माल जप्त !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.