Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कसब्यात आम्ही दिलेले हेमंत रासने उत्तम उमेदवार पण…’; पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची प्रतिक्रिया

कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 02, 2023 | 02:20 PM
bawankule

bawankule

Follow Us
Follow Us:

पुणे : कसबा (Kasba Peth Bypoll) विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून, यामध्ये महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. तर भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरु झाली. यामध्ये कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. कसब्यात रवींद्र धंगेकरांचा 11 हजार 040 मतांनी विजय झाला तर हेमंत रासनेंना 61,771 मते मिळाली आहेत. धंगेकर यांना एकूण ७२ हजार ५१९ मते मिळाली आहेत, तर हेमंत रासने यांना ६१७७१ एकूण मते मिळाली आहेत. या पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कसबा मतदारसंघात आम्ही मतदारापर्यंत गेलो. जनतेने कौल दिला नाहीतर आम्ही आत्मपरिक्षण करु. आम्ही चिंचवडमध्येही तशीच निवडणूक लढली आहे. चिंचवडमध्ये आम्ही पुढे आहोत. यामुळे आम्ही कसबा मतदारसंघात आत्मपरिक्षण करु’.

आम्ही दिलेले उमेदवार उत्तम

‘कसबा पेठ मतदारसंघात आम्ही दिलेले हेमंत रासने हे उत्तम उमेदवार आहेत. त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे. या मतदारसंघातील सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून उमेदवारी देतो. पण, शेवटी जनता ठरवत असते’, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Web Title: Hemant rasane is a good candidate says bjp state president chandrashekhar bawankule nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2023 | 02:19 PM

Topics:  

  • Balasaheb Dabhekar
  • chandrashekhar bawankule
  • Congress
  • Congress Politics
  • Hemant Rasane
  • Nana patole
  • political news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
2

‘सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकत्रित…’; चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
3

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन
4

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक; आज करणार देशव्यापी आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.