Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महामंडळाची पहिली एसटी होती ‘लाकडाची आणि कापडाची’! जाणून घ्या महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीचा इतिहास

महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खाजगी व्यावसायिकांमार्फत झाली होती. पुढे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारी यंत्रणेची गरज भासू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात 'बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन' ची स्थापना करण्यात आली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 25, 2026 | 03:50 PM
महामंडळाची पहिली एसटी होती ‘लाकडाची आणि कापडाची’! जाणून घ्या महाराष्ट्राच्या लाडक्या लालपरीचा इतिहास
Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस, म्हणजेच आपली लाडकी ‘लालपरी’, ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेड्याची जीवनवाहिनी बनली आहे. ग्रामीण भागाला शहरांशी जोडणारा हा एक अत्यंत भक्कम दुवा आहे. सर्वसामान्य जनता, नोकरदार, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी एसटी हे हक्काचे, सुरक्षित आणि परवडणारे वाहतुकीचे साधन आहे. फक्त वाहतुकीचे साधनचं म्हणून नव्हे तर आपल्या सर्वांच्या मनात एक अत्यंत भावनिक स्थान एसटीने म्हणजे आपल्या लालपरीने निर्माण केले आहे.

एसटीचा उगम आणि सुरुवातीचा प्रवास

महाराष्ट्रात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खाजगी व्यावसायिकांमार्फत झाली होती. पुढे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सरकारी यंत्रणेची गरज भासू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात ‘बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ (बीएसआरटीसी) ची स्थापना करण्यात आली आणि सार्वजनिक वाहतुकीचा एकाधिकार या कंपनीला देण्यात आला.

MSRTC News : लालपरीच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर

पहिली एसटी

या महामंडळाची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर (आजचे अहिल्यानगर)  या मार्गावर धावली. या ऐतिहासिक प्रवासाचे चालक तुकाराम पांडुरंग पठारे आणि वाहक लक्ष्मण केवटे हे होते. सुरुवातीच्या काळातील एसटी बसची रचना अतिशय वेगळी आणि युनिक होती. तिची बॉडी लाकडाची आणि छप्पर कापडाचे होते, तसेच तिची एकूण आसनक्षमता फक्त ३० प्रवाशांचीचं होती. नंतरच्या काळात शेवरले, बेडफोर्ड, लेलँड आणि फियाट अशा विविध कंपन्यांच्या बसगाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या.

एमएसआरटीसीची स्थापना आणि विस्तार

१९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यातूनच आजचे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ (एमएसआरटीसी) अस्तित्वात आले. “गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी” हे ब्रीदवाक्य घेऊन महामंडळाने खेड्यापाड्यांपर्यंत आपले जाळे विस्तारले. सध्या महाराष्ट्रात ३१ विभागांद्वारे एसटीचे कामकाज चालते. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा या शेजारील राज्यांमध्येही एसटीची आंतरराज्यीय सेवा अविरतपणे सुरू आहे.

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; वेतनवाढ, महागाई भत्तासंदर्भात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

आधुनिकता आणि बदलता चेहरा

काळाच्या ओघात एसटीने स्वतःच्या सेवेत अनेक आधुनिक बदल केले आहेत. साध्या आणि निमआराम गाड्यांसोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आल्या. डिसेंबर २००२ मध्ये दादर ते पुणे मार्गावर ‘अश्वमेध’ ही पहिली वातानुकूलित बस सुरू झाली. आज महामंडळाच्या ताफ्यात शिवनेरी, अश्वमेध, शीतल आणि २०१७ पासून ‘शिवशाही’ सारख्या आरामदायी आसन आणि शयनयान- स्लीपर श्रेणीतील बसेस उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करत एसटीने तिकिट आरक्षणासाठी स्वतःचे संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपही सुरू केले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सुविधाही दिली जाते.

सामाजिक बांधिलकी

एसटी ही केवळ एक व्यावसायिक वाहतूक सेवा नसून महाराष्ट्राची सामाजिक गरज आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जाण्याकरिता आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तालुका व जिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचवण्यासाठी लालपरी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ही लालपरीची बस सेवा राज्याच्या प्रगतीचे आणि आर्थिक तसेच सामाजिक समृद्धीचे एक खरे आणि जिवंत प्रतीक मानली जाते.

Web Title: History of maharashtras st bus the lalpari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • automobile
  • maharashtra
  • MSRTC Bus

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.