Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : कोर्टी येथे मालट्रकचा भीषण अपघात; ट्रक पुलावरुन 30 फुट खाली सर्व्हिस रोडवर कोसळला

Satara News : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. मालट्रक पुलावरून सर्व्हिस रोडवर सुमारे ३० फुट खाली कोसळल्याने अपघात झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2026 | 05:34 PM
Horrific Accident Involving a Cargo Truck on the Pune-Bangalore Asian Highway Driver Injured satara news

Horrific Accident Involving a Cargo Truck on the Pune-Bangalore Asian Highway Driver Injured satara news

Follow Us
Follow Us:

Satara News : उंब्रज : पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर कोर्टी ता.कराड गावच्या हद्दीत मालट्रक पुलावरून सर्व्हिस रोडवर सुमारे ३० फुट खाली कोसळल्याने झालेल्या भीषण अपघात (Accident News) झाला. यामध्ये मालट्रकचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यावेळी सर्व्हिस रो़डवरून यावेळी पादचारी आणि वाहने यांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम आणि पुलाच्या दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा सुरू असल्याने कोर्टी गावच्या हद्दीत गेल्या दीड वर्षात तीन वाहने पुलावरून खाली कोसळली आहेत. तसेच येथे दुचाकीला अपघात होऊन दोन महिला ठार झाल्याची घटना याच ठिकाणी घडली आहे. असे असताना येथे ठेकेदार कंपनीकडून हलगर्जीपणाने काम सुरू आहे. येथे वारंवार झालेल्या अपघातानंतर कोर्टी ग्रामस्थांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून महामार्ग रोखला होता. यावेळी उंब्रज पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. परंतु पोलिसांकडून संबंधित ठेकेदार कंपनी विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.

हे देखील वाचा : निवडणूक आयोगाचा मतता दीदींना दणका; तृणमूल कॉंग्रेसला दिला अंतिम इशारा

या परिसरात कोणत्याही प्रकारचे लोखंडी बॅरिकेट, सूचनाफलक आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात आल्या नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक थेट महामार्गावरील पुलावरून सेवा रस्त्यावर तीस फूट खाली येऊन कोसळला. या अपघातात मालट्रकचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ट्रकच्या केबिनसह संपूर्ण बॉडी चक्काचूर झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.

सदर अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात झाली नव्हती. दरम्यान कोर्टी येथे ज्या ठिकाणी अपघात झाला तेथे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहनांची व ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. मात्र पहाटेच्या सुमारस येथे कुणीही नसल्याने मोठे दुर्घटना टळली. ग्रामस्थांनी या अपघातानंतर तीव्र संताप व्यक्त केला असून ठेकेदार कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

हे देखील वाचा : खासदार गटाची आढावा बैठकीला दांडी; सातारा नगरपालिकेत नक्की चाललंय तरी काय?

 

Web Title: Horrific accident involving a cargo truck on the pune bangalore asian highway driver injured satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:34 PM

Topics:  

  • Accident News
  • Satara Accident
  • Satara News

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
2

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
3

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश
4

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.