शिवाजी महाराजांच्या सैन्यात नक्की किती मुस्लिम सरदार होते? काय सांगतात इतिहासकार? वाचा सविस्तर
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांवरून मत्स्य व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम अधिकारी आणि सैनिक नव्हते, असा दावा त्यांनी केला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य महाराष्ट्राला परवडणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम लोकही होते. नितेश राणेंनी इतिहास वाचावा असा सल्ला दिला होता. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी दर एक्सवर शिवाजी महाराजांच्या मुस्लिम सरदारांची संपूर्ण यादीच पोस्ट केली आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकातही मुस्लिम सरदारांचा उल्लेख आहे.
सिद्धी हिलाल : आरमार प्रमुख
मदारी म्हेतर : शिवाजी महाराजांचा खास नोकर
इब्राहिम खान : शिवरायांचा तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांनी अनेक युद्धात महत्त्वपू्र्ण भूमिका घेतली आहे.
दौलत खान : हे पण महत्त्वाच्या पदावर, शिवरायांच्या अनेक मोहिमांमध्ये होता सहभाग
सिकंदर : छत्रपती शिवाजी महाराजांचा खास अधिकारी, त्यांच्या किल्ल्यांच्या रक्षणाची जबाबदारी सिकंदर यांच्यावर होती.
मुस्लिम मावळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात हिंदू आणि मुस्लिम सैनिकांचा सहभाग होता. तर गनिमी काव्यात सुद्धा अनेक निष्ठावंतर सैनिक आणि सरदारांचा समावेश होता.
माननीय मंत्र्यांनी वाचावे असे… pic.twitter.com/68ELwNokF1 — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 12, 2025
१६४८ च्या सुमारास ५००-७०० मावळे शिवाजी महारांच्या सैन्यात आल्याचा उल्लेख गोविंद पानसरेंच्या पुस्तकात आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादीच ट्वीट केली आहे. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर १९ मुस्लीम सरदारांची यादी मिटकरींनी ट्वीट केली. नितेश राणे यांचं नाव न घेत मिटकरींनी शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदार, अधिकारी, सैनिकांच्या नावाची यादीच ट्विट केली आहे. ‘मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचला पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ हिंदूंच राज्य नव्हतं. ते केवळ मुस्लीम विरोधी राष्ट्र नव्हतं. ते १८ पगड जाती आणि ते १२ बलुतेदारांचं स्वराज्य होतं.’, असं अमोल मिटकरींनी सांगतं नितेश राणेंना खोचक टोला लगावला आहे.