नारळ, फुले, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रकार
Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही;
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर असलेल्या रस्त्यावर फोडलेले नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू आणि नैवेद्य अशी सामग्री सकाळी नागरिकांच्या नजरेस पडली. सहयोग सोसायटीसमोर करण्यात आलेल्या या कथित भानामतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच घटनेची चर्चा क्षणार्धात सर्वत्र पसरली.
निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नागरिकांमध्ये विविध तर्क–वितर्कांना पेव फुटले असून, काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूनेच हा प्रकार घडवून आणला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने एखाद्याचे तिकीट मिळावे किंवा कोणाचे तिकीट कापले जावे, यासाठीच हा प्रकार रचला गेला का? अशा चर्चांनाही बारामतीमध्ये उधाण आले आहे.
Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी नवीन रणनीती स्वीकारत विरोधकांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत सहकार क्षेत्रातील कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्यासोबत अनपेक्षित युती करण्यात आली आहे. या युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीमध्ये औपचारिक आघाडी झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुयोग सातपुते यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे प्रखर विरोधक म्हणून ओळखले जाणारे रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत समझोत्याचा मार्ग स्वीकारला आहे. या करारानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगराध्यक्षपदासह 10 जागांवर तर जनमत विकास आघाडी 7 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. गावात जातीय अस्मिता, नाराजी आणि गटबाजीचे प्रश्न यंदाही प्रकर्षाने समोर आले आहेत. मात्र राष्ट्रवादीने यावेळी उमेदवार निवड प्रक्रियेत समन्वयाला प्राधान्य देत अनेक प्रभागांत सर्वानुमते उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी आणि तणाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. विरोधकांना सामावून घेण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रभागांमध्ये त्रिकोणी किंवा चुरशीच्या लढती होण्याऐवजी सरळ आणि सुलभ सामना होण्याची शक्यता अधिक आहे.






