पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच...; संजय शिरसाटांना नेमकं म्हणायचं काय?
Sanjay Shirsat News: राज्यात गणेशोत्सवाचे वारे वाहू लागले आहेत. पण राज्य सरकारने कर्णकर्कश डीजे वाजण्यावर बंदी घातली आहे. या डीजेंवरून मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर मधील गणेश मंडळांना डीजेऐवजी बँड आणि बँजो मागवण्याचे आवाहन केलेआहे. याचवेळी संजय शिरसाटांनी एक टिप्ण्णीही केली आहे. पण या टीप्पण्णीमुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
“तुम्ही बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे,”अस शिरसाट यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शिरसाट यांचा एका खोलीतील व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यात व्हिडीओत ते त्यांच्या खोलीत बसलेले दिसत असून त्यांच्या जवळच एक पैशांनी भरलेली बॅगही दिसत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली.हे प्रकरणही चांगेलच तापले होते. यानंतर आता शिरसाटांनी केलेली टीप्पण्णीमुळे पुन्हा वादाची ठिणगी पडणार असल्याचे दिसत आहे.
” अनेकजण वाद झाला पाहिजे, अशा मानसिकतेत आहेत. पण मी सर्व मंडळांच्या अध्यक्षांना विनंती करतो की, डीजेचा वापर करायचा नाही. त्याऐवजी चाळीसगावचा बँड किंवा वैजापूरचा बेंजो मागवा. पैसे कमी पडले तर हे सर्व नेते मंडळी आहेत, त्यांच्याकडे मागा,” असे सांगत संजय शिरसाट यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ पसरला. तसेच, “काही झालं नाही तर मी आहेच… माझी बॅग उघडीच आहे.” शिरसाटांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी आणखी मोठा टाळ्यांचा कडकडाट आणि हशा केला.
शिरसाट म्हणाले, गणेशोत्सवात आपण सर्वांना चांगला संदेश देऊ, व्हिडीओ वगैरे सोडू द्या, हे सगळं चालत राहते. संजय शिरसाट त्याची कधी चिंता करत नाही. लोक आपल्याला करोडपती सदमत असतील तर आपल्या बापाचं काय जातय. आपण चिंता करायची नाही. शहर चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. असंही शिरसाट यावेळी म्हणाले.
चेहऱ्यावरील डागांमुळे त्वचा अतिशय निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ फेसपॅक करेल जादुई कमल,त्वचा होईल चमकदार
कर्णकर्कश डीजेमुळे होणाऱ्या त्रासांकडेही शिरसाटांनी लक्ष वेधले. शिरसाट म्हणाले, काही गणेशमंडळांचे अध्यक्ष मला शहाणपाणा शिकवत होते. आम्ही डीजेवाल्याला १० हजार देऊन बसलोय, पण ते १० हजार गेले तरी चालतील एखाद्या मुलाचे कान गेले तर त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. एखादा हार्ट अटॅक ने गेला तर त्याचा संसार उद्ध्वस्त होईल.
माझा एक कार्यकर्ता आला आणि त्याने माझे भरभरून कौतुक केले. त्याने आठ लाखांचा डीजे आणला आणि मला तिथे बोलावलं. माझ्यासाठी तब्बल १०० किलोचा फुलांचा हार आणला. मला वाटलं, हा हार गळ्यात टाकून माझ्या वजनापेक्षा जास्त वजनाने फाशी देतो की काय! देवाशप्पथ सांगतो, त्या क्षणी माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते,” असा किस्सा आमदार संजय शिरसाट यांनी रंगवला. “आठ लाखांच्या डीजेचा एवढा आवाज होता की मी खालपासून वरपर्यंत थरथरत होतो. डीजेमुळे शारीरिक नुकसान होऊ शकतं. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की डीजे वापरू नका.”असही त्यांनी सांगितलं. सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांना माझे आव्हान आहे की डीजे बंद ठेवा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी भोंगे उतरवले. आता काही जण वाद पेटवण्यासाठी मुद्दाम डीजेचा वापर करत आहेत. त्यामुळे डीजे लावू नका,” असे आवाहन आमदार संजय शिरसाट यांनी केले.