Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

कसबा बावडा येथे शिवसेना ठाकरे गटाचे उप-शहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2024 | 12:19 PM
कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यास धक्काबुक्की; हजारो कार्यकर्ते आमने-सामने

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : कसबा बावडा येथे शिवसेना ठाकरे गटाचे उप-शहरप्रमुख राहुल माळी यांना बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. दोन्ही गटाचे एक हजार कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले.

शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. राहुल माळी (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडिओ काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला होता. याबाबत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका तरुणाने फोन करून धमकावले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास भगवा चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव आणि माळी यांनी एकमेकांना गद्दार असे संबोधल्याने वादाला सुरुवात झाली.

आदर्श सुनील जाधव याने माळी यांचा गळा पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच कार्यकर्त्यांनी भगवा चौकात धाव घेऊन गर्दी केली. त्याचवेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेले राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत कदम भगवा चौकातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जमावाने हॉटेलच्या बाहेर गर्दी करताच आमदार सतेज पाटील भगवा चौकात पोहोचले. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी चर्चा करून क्षीरसागर आणि कदम यांना दुसरीकडे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार टिके यांच्या विनंतीनुसार क्षीरसागर आणि कदम निघून गेले. आमदार पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर १० मिनिटे ठिय्या मारला. काही वेळाने कार्यकर्ते निघून गेले. मात्र, या घटनेने सुमारे तासभर कसबा बावडा येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा : पुण्यात बार अँड रेस्टाँरट फोडले, दारूच्या बाटल्यांची चोरी; नेमकं काय घडलाय प्रकार?

जमाव वळविल्याने अनर्थ टळला

दत्त मंदिर कॉर्नर येथील बलभीम विद्यालयाजवळ तरुणांची गर्दी झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षीरसागर आणि कदम सुनील जाधव आणि त्यांचा मुलगा आदर्श यांना आपल्या गाडीत घेऊन ते निघून गेले. काही तरुणांनी क्षीरसागर यांच्या गाडीचा पाठलाग केला. कवडे गल्लीच्या कोपऱ्यावर गाडी थांबल्यानंतर जमावाने क्षीरसागर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी भगवा चौकात धाव घेऊन जमावाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे वळविल्याने अनर्थ टळला.

Web Title: In kolhapur the office bearer of the thackeray group has been pushed by the activists of the shinde group nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Election
  • kolhapur
  • Satej Patil
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
1

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील
2

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Latur Municipal Election 2026: लातूरमध्ये प्रोटोकॉल डावलून अपक्षांचा मुंबईत; पक्षप्रवेश शिंदे गटात अंतर्गत संघर्ष उफाळला
3

Latur Municipal Election 2026: लातूरमध्ये प्रोटोकॉल डावलून अपक्षांचा मुंबईत; पक्षप्रवेश शिंदे गटात अंतर्गत संघर्ष उफाळला

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश
4

मोठी बातमी! मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! एकनाथ शिंदेनी फिरवला गेम; ‘या’ बड्या नेत्याचा शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.