In Power With Bjp Modi Meet For 10 Minutes Ajit Pawar Gives Big Gift To Pune 4 Projects Will Be Implemented Nryb
अजित पवार-पंतप्रधान मोदींची 10 मिनिटे भेट अन् पुण्याला मोठं गिफ्ट; ४ प्रकल्प लावणार मार्गी
अजितदादा पवार यांनी कालच्या मोदींच्या दौऱ्यात त्यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पुण्याला मोठे गिफ्ट मिळणार असल्याचे सूतोवाच केले आहे. त्याचबरोबर पुण्याचे अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे देखील सांगितले. रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पालकमंत्रिपद घेणार काय? याबाबत विचारता अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. त्याचवेळी पुणेकरांना मोठे गिफ्ट देणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो, घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना इत्यादी अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार आणि मोदी यांच्यात 10 मिनिटे झालेल्या चर्चेत पुण्याला नवीन गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा
‘पुण्यातील पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासारख्या रखडलेल्या प्रकल्पांना येत्या काळात निश्चित गती दिली जाईल. त्यासाठी दर आठवड्याला मी पुण्यात बैठक घेणार आहे,’ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात चर्चा झाल्याचेही पवार यांनी सांगितले.
पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी नवीन प्रकल्प
पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी रिंग रोड, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक रेल्वे, ग्रीन कॉरिडॉर, पुणे-बंगळुरू एक्स्प्रेस हायवे यासाररखे सुमारे ४० ते ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सध्या प्रस्तावित आहेत. हे प्रकल्प रखडले आहेत. या प्रश्नांबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सुपरफास्ट व्यासपीठाच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला. सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांचा पत्रकारांशी संवाद
महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘पुरंदर विमानतळाबाबत दोन वाद आहेत. काही जणांना अलीकडे विमानतळ व्हावे असे वाटते, तर काही जणांना पलीकडे व्हावे असे वाटते. पण, कोणाला काय वाटते यापेक्षा नागरी विमान वाहतूक विभागाने काही परवानग्या दिल्या आहेत.
पुणे शहराला आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याची गरज
पुणे शहराला भविष्याचा विचार करता आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याची गरज आहे. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू होणे गरजेचे आहे. गेली एक वर्षे मी विरोधी पक्षात होतो. आज दुपारी मला या गोष्टींवर बोलायचे होते. परंतु, पंतप्रधानांच्या कार्यक्रमात वेळ कमी होता. या निमित्ताने पुणे शहराच्या दृष्टीने जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत, ते मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
Web Title: In power with bjp modi meet for 10 minutes ajit pawar gives big gift to pune 4 projects will be implemented nryb