औंरगाबाद: पैठणगेट (Paithangate) परिसरातील कॉलसेंटर तीन दिवसापूर्वी उत्तराखंडच्या (Uttarakhand) डेहाराडून आणि औरंगाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत उद्ध्वस्त केले होते. याच कॉलसेंटरची (Weapons In Call Center) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतलेल्या झडती घेतली. तेव्हा या कॉल सेंटरमध्ये दोन तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राऊंड असा मुद्देमाल सापडला आहे.
[read_also content=”श्रीलंकेसारखाच पाकिस्तानही गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर, 65 लाख बेरोजगार युवक, भारतासाठी धोक्याची घंटा ? https://www.navarashtra.com/world/after-sri-lanka-pakistan-is-on-verge-of-home-war-65-lakh-people-dont-have-job-nrsr-364177.html”]
पैठणगेट परिसरातील बागवान मंगल कार्यालयाजवळ झोहेब सय्यद (वय ४५,रा.सेव्हन हिल परिसर) यांचं एक कॉल सेंटर आहे. यश एंटरप्रायजेस असं या कॉल सेंटरचं नाव आहे. यश एंटरप्रायजेस या कॉल सेंटरवर तीन दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या डेहराडून सायबर पोलिसांनी आणि औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा, सायबर पोलीस आणि क्रांतीचौक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा मारला होता. त्यावेळी या कॉलसेंटरमधून जवळपास १ हजार मोबाईल हॅण्डसेट पोलिसांनी जप्त केले होते. या कॉल सेंटरमधून देशातील विविध राज्यांत फोनद्वारे ऑनलाइन फसवणूक करण्यात येत होती, असा आरोप डेहराडून पोलिसांनी केला आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कॉलसेंटरची झाडाझडती घेतली असता त्या ठिकाणाहून दोन धारदार तलवारी, दोन धारदार चाकू, एक एअरगन, एक रिव्हॉल्वरची मॅग्जीन, ११ राउंड, एक अॅश ट्रे, असा एकूण ६ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी गुन्हेशाखेचे सहाय्यक फौजदार शेख हबीब शेख मोहम्मद खान (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून झोहेब खान, रविकिरण कुमार मनवर (वय ३१, रा. भोईवाडा) यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक विकास खटके करीत आहेत.