Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील वृक्षगणनेच्या ‘डेटा’ देखभालीत घोटाळा? ‘सार्क आयटी’ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता

कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा दावा करत दौंडकर यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. निविदा प्रक्रियेतील अनेक संशयास्पद बाबींवर बोट ठेवताना, तात्काळ चौकशी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 08:29 AM
मुंबईतील वृक्षगणनेच्या 'डेटा' देखभालीत घोटाळा? 'सार्क आयटी'ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता

मुंबईतील वृक्षगणनेच्या 'डेटा' देखभालीत घोटाळा? 'सार्क आयटी'ला दिले झुकते माप, प्रकरण न्यायालयात जाण्याची दाट शक्यता

Follow Us
Follow Us:

मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष गणनेच्या डेटा देखभालीचे कंत्राट केवळ एकाच विशिष्ट कंपनीला देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे. याप्रकरणी मेसर्स सार्क आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राट दिल्याचा दावा करत दौंडकर यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी केली आहे. निविदा प्रक्रियेतील अनेक संशयास्पद बाबींवर बोट ठेवताना, तात्काळ चौकशी न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी का लांबली? केंद्र सरकारच्या ‘त्या’ डेटामुळे प्रक्रिया रखडली

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी पुराव्यांसह पालिका प्रशासनावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या आरोपानुसार, २१ जून २०१८ रोजी वृक्ष प्राधिकरण विभागाकडून अत्यंत घाईघाईने आणि कमी कालावधीची निविदा काढण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आणि वाढीव दरांचा मोठा घोळ समोर आला आहे. सार्क आयटी कंपनीने १५ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्यान अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात पुढील पाच वर्षांसाठी प्रति झाड ९.०० रुपये दराने काम करण्याची लेखी तयारी दर्शवली होती. असे असतानाही, नवीन निविदेमध्ये मूळ किमतीपेक्षा सुमारे २५ टक्के बजेट वाढवून हे कंत्राट तब्बल १,६८,१०,३३० रुपये (१ कोटी ६८ लाख) एवढ्‌या मोठ्या रकमेला मंजूर करण्यात आले. पूर्वी कमी दरात काम करण्यास तयार असलेल्या कंपनीला वाढीव दराने कंत्राट देणे म्हणजे जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप दौंडकर यांनी केला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

मंजुरीनंतर ६ महिन्यांनी काम सुरू

मात्र, अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी तब्बल ६ महिन्यांचा काळ लागला. जर काम सुरू करण्यासाठी पुढे एवढा वेळ लागणार होता, तर मग पालिकेने नियमित निविदा प्रक्रिया का राबवली नाही, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.याशिवाय, निविदेमध्ये सुरुवातीला पूर्वी वृक्षगणनेचे काम केलेल्या कंपनीलाच हे कंत्राट दिले जाईल’ अशी पूर्वग्रहदूषित अट घालण्यात आली होती, ज्याचा थेट फायदा फक्त ‘सार्क आयटी’ कंपनीलाच झाला.

धागेदोरे थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत

या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जात असल्याचा संशय असून, सार्क आयटी कंपनीचे संचालक पालिकेच्या उद्यान अधीक्षकांच्या कार्यालयात नियमितपणे वावरत असल्याचे पालिकेच्या सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होऊ शकते, असे दौंडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.या प्रकरणात सह-आयुक्त, उद्यान अधीक्षक, वृक्ष अधिकारी आणि तत्कालीन पालिका आयुक्त व वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष यांनी मिळून हा भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप करण्यात आला असून, दोषींवर कडक कारवाई न झाल्यास या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे संतोष दौंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Mumbai Gaming Zone : मुंबईतील सर्व मॉलमधील गेमिंग झोनची सुरक्षा तपासणार सरकार; मोठ्या घटनेनंतर महत्त्वाचा निर्णय

कंत्राटासाठी एकूण दोनच अर्ज झाले होते प्राप्त

या कंत्राटासाठी एकूण दोनच अर्ज आले होते, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक क्षमता असलेली ‘मेसर्स कॉन्सेप्ट कम्युनिकेशन्स प्रा. लि.’ ही कंपनी तांत्रिक निकष पूर्ण न केल्यामुळे अपात्र ठरली. दौंडकर यांच्या मते, ही कंपनी केवळ निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक आणि कायदेशीर दिसावी म्हणून उभी केलेली एक ‘डमी’ कंपनी होती. सार्क आयटीला कंत्राट मिळवून देणे हा आधीच ठरलेला कट होता, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Irregularities in mumbais tree census data maintenance saark it favored strong possibility of the matter reaching court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Tree
  • tree cutting

संबंधित बातम्या

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
1

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
2

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम
3

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
4

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.