Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसूर-कराड रस्त्यावरील पूल बनले मृत्यूचे सापळे; संरक्षण कठड्यांची दुरावस्था

कराड रस्त्यावरच्या पुलांच्या संरक्षण कठड्यांची झालेली दुरवस्था व मोडतोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आली आहे. या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 22, 2025 | 04:13 PM
मसूर-कराड रस्त्यावरील पूल बनले मृत्यूचे सापळे; संरक्षण कठड्यांची दुरावस्था

मसूर-कराड रस्त्यावरील पूल बनले मृत्यूचे सापळे; संरक्षण कठड्यांची दुरावस्था

Follow Us
Close
Follow Us:

मसूर : कराड रस्त्यावरच्या पुलांच्या संरक्षण कठड्यांची झालेली दुरवस्था व मोडतोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आली आहे. या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. एकंदरीत या रस्त्यावरील पूल मृत्यूचे सापळेच बनले आहेत. बांधकाम खात्याचे दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. मोठा अनर्थ घडल्यावरच बांधकाम खाते जागे होणार आहे काॽ असा प्रश्न ग्रामस्थांसह वाहनधारकांना पडला आहे.

मसूर-कराड हा रस्ता खंडाळा-शिरोळ राज्यमार्ग क्र.१४६ आहे. हा वाहन चालकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र-४ला पर्यायी रस्ता असल्याने नियमित होणाऱ्या वाहतुकीसह प्रामुख्याने टोल नाका चुकवण्यासाठी अवजड वाहतूक या मार्गाने होत आहे. शिवाय यामार्गावर शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठी असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमी मोठी वर्दळ आहे. त्यातच परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टरांची संख्याही मोठी आहे. या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ आहे.

कराडमधील बहुतांश पुलांचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी देखील तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे याठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तुटलेल्या कठड्यामुळे अनेक चालकांना अंदाज येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पुलाच्या संरक्षण कठड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

रखडलेल्या चौपदरीकरणामुळे वाहनकोंडीत भर

बनवडी फाटा ते मसूर पर्यंतच्या रस्त्याचे रखडलेल्या चौपदरीकरण कामामुळे वाहनधारकांना वाहनकोंडीचा सामना करावा लागतो. बनवडी फाटा ते मसूर एवढाच ११ किलोमीटर अंतराचा महत्वाचा टप्पा मागे राहिला आहे. त्यामुळे रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांतून केली जात आहे.

बळी गेल्यानंतर बांधकामला जाग येणार काॽ

बनवडी फाट्यापासून मसूरच्या जुन्या बसस्थानक मुख्य चौकापर्यंत मोक्याच्या ठिकाणी रमलर पट्टे बसवने देखील गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वरचेवर संरक्षण कठडे, दिशादर्शक फलक यांची पाहणी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी मोठा अपघात झाल्याशिवाय व निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येणार काॽ असा प्रश्न वाहनधारकांनी केला आहे.

अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तुटलेल्या संरक्षण कठड्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडत आहेत. रात्री अपरात्री नवख्या वाहनचालकांना अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडतात. मोठ्या संभाव्य अपघाताची प्रतीक्षा न बघता बांधकाम विभागाने पूलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी. – सुनिल चव्हाण. ग्रामस्थ कोपर्डे हवेली

Web Title: It is being demanded that the bridge on the masoor karad road should be fitted with a protective wall nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Accident
  • Bridge
  • cmomaharashtra
  • maharashtra

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.