Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime News: चोरट्यांनी घर फोडलं अन् सोन्याचा खजिना लुटला! जळगावातील घटनेने खळबळ

Jalgaon Crime News: जळगाव शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक महाकाल दर्शनासाठी उज्जैनला गेले असताना चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 28, 2026 | 03:55 PM
Jalgaon Crime News: चोरट्यांनी घर फोडलं अन् सोन्याचा खजिना लुटला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Jalgaon Crime News: चोरट्यांनी घर फोडलं अन् सोन्याचा खजिना लुटला! ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांचा प्रवेश.
  • ४५-४६ तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड चोरीला.
  • घरमालक उज्जैनला गेल्याची संधी साधल्याचा प्राथमिक अंदाज.
 

Maharashtra Crime News: जळगाव शहरात घरफोडीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. आता रामेश्वर कॉलनीजवळील विश्वकर्मा नगरात चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष्य केल्याचं समोर आलं आहे. घरातील सुमारे ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये रोख चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. रहिवासी भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक काही दिवसांसाठी उज्जैनला महाकाल दर्शनासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. रात्रीच्या वेळी घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून चोरटा आत शिरला. ही घटना रात्री साधारण दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने थेट बेडरूम गाठले. तेथील कपाट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कपाटाचा बंदोबस्त तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरट्याने पोबारा केला. घरमालक परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांचा तातडीने तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक विश्वकर्मा नगरात दाखल झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरी नेमकी कशी झाली आणि चोरट्याने कोणत्या मार्गाने घरात प्रवेश केला, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

घरामध्ये तसेच परिसरात काही पुरावे मिळतात का, यासाठी ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. घटनास्थळावरून आवश्यक नमुने आणि इतर माहिती गोळा करण्यात आली आहे. पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली. मात्र श्वान पथकाला घराच्या आसपासच्या भागापुढे ठोस दिशा मिळाली नाही. त्यामुळे तपासासाठी आता इतर पुराव्यांवर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे. Jalgaon Crime News:

सीसीटीव्हीमध्ये संशयित कैद?

या प्रकरणात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरू शकतात. घराच्या आसपास आणि इतर ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीच्या हालचाली, येण्याचा आणि जाण्याचा मार्ग याचा तपास केला जात आहे. फुटेजमधून मिळणारी माहिती इतर पुराव्यांशी जुळवून पाहण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे.

Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत

चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये भीती

रहिवासी भागातील बंद घर फोडून एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐवज नेण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेषतः काही दिवसांसाठी घर बंद ठेवून बाहेर जाणाऱ्या कुटुंबांसाठी ही घटना चिंतेची बाब बनली आहे. या प्रकरणात चोरीला गेलेल्या सोन्याची आणि रोख रकमेची नेमकी किंमत अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

Ganpati Special Train: कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! दादरहून सुटणार ‘मोदी एक्सप्रेस’; जाणून घ्या वेळ, थांबे अन् बुकिंग

सीसीटीव्ही चित्रण, घटनास्थळावर मिळालेले ठसे आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. चोरटा कोण होता, त्याने घराची आधी पाहणी केली होती का आणि या चोरीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांनी घर काही काळासाठी बंद ठेवताना विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. घराच्या सुरक्षेची व्यवस्था तपासणे आणि परिसरातील संशयास्पद हालचालींबाबत सतर्क राहणे महत्त्वाचे ठरते.

Web Title: Jalgaon house burglary 45 46 tola gold and rs 15 lakh cash stolen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Crime in Jalgaon
  • Jalgaon News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला
1

Purandar Airport Land Acquisition: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनावरून सासवडमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक
2

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त
3

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त

समलैंगिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला पोलिसांचा विवाह मोडला?
4

समलैंगिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला पोलिसांचा विवाह मोडला?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.