Jalgaon News: जवानांच्या मनगटावर बांधला जाणार अभिमानाचा धागा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ही राखी व पत्रे १८ महाराष्ट्र बटालियन, जळगाव येथील सैनिक बांधव, कर्नल, मेजर व पदाधिकाऱ्यांसाठी पाठविण्यात येणार आहेत. विद्यालयाचे शिक्षक एस. आर. ठाकूर हे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत. त्यांनी विद्यार्थिनींना या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगत सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता आणि देशप्रेमाची भावना जोपासण्याचे आवाहन केले. आवाहनाला विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
१८ महाराष्ट्र बटालियनकडे राख्या केल्या सुपूर्दचे सर्व राख्या व शुभेच्छापत्रे विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर मनोज चौधरी यांच्यामार्फत जळगाव येथील १८ महाराष्ट्र बटालियनकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एम. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थिनीच्या सामाजिक जाणीवेचे व देशप्रेमाच्या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल आदरभाव असणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले. Jalgaon News:
यावेळी उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. ब-हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या या उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण केवळ नात्यांचा नव्हे, तर देशरक्षणासाठी समर्पित असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सणही ठरला आहे. त्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे






