Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare News:  जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक

Sushma Andhare: आमदार नितीन देशमुख यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत प्रशासनाला जाब विचारल्याचे अंधारे यांनी सांगितले. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासोबतच चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी त्यांनी केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 26, 2026 | 04:00 PM
Amravati Hospital Fire, Sushma Andhare Amravati

Amravati Hospital Fire, Sushma Andhare Amravati

Follow Us
Follow Us:
  • प्राथमिक तपासातील माहितीनुसार एनआयसीयू मधील व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागल्याचा अंदाज
  • रुग्णालयाचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट वेळेवर झाले होते का, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला.
  • प्रशासकीय अधिकाऱ्यांचा शोध सुरू असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
Amravati Womens Hospital Fire Sushma Andhare : ‘अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत आधीच माहिती असतानाही उपाययोजना झाल्या नसतील, तर संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये,’ असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकार आणि आरोग्य प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यासंदर्भात सुषमा अंधारे यांनी स्थानिक प्रशासनावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, “मी एक आई आहे, त्यामुळे एका आईचे दुःख काय असते, हे मला समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि इतर दोन आमदारांना अमरावतीत जाऊन घटनेची माहिती घेण्यास सांगितले.

Hinjawadi IT Park Pune Road: चाकणनंतर आता हिंजवडीत खराब रस्ते अन् वाहतूक कोंडी आयटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

‘फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट कुठे आहे?’

या दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू असताना प्राथमिक माहितीनुसार NICU मधील व्हेंटिलेटरमध्ये बिघाड होऊन आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. २४ ऑगस्टच्या पहाटे सुमारे ३.१५ वाजता ही आग लागली. त्यावेळी SNCUमध्ये ३९ नवजात बालके दाखल होती. त्यापैकी ३ बालकांचा मृत्यू झाला, तर ३६ बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दोन तासांपासून आम्ही चौकशी समितीतील अधिकाऱ्यांचा शोध घेत आहोत,” अस सांगत रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेच्या कागदपत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच, अंधारे यांनी आपल्याला फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिटची कागदपत्रे मिळाली नसल्याचाही दावा त्यांनी केला.

“लोकल पद्धतीने केलेले वायरिंग या दुर्घटनेला कारणीभूत ठरले असण्याची शक्यता आहे. अशी दुर्घटना होऊ शकते, याची जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती होती, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये?” असा सवाल त्यांनी केला. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. अमरावती प्रशासनाने रुग्णालयाचे नियमित फायर ऑडिट झाले असल्याचे आणि यावर्षीच्या ऑडिटसाठीही अर्ज करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे फायर ऑडिट झाले की नाही आणि त्यातील त्रुटींची पूर्तता झाली होती का, हा मुद्दा चौकशीत महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, दुर्घटनेनंतर राज्यातील सरकारी, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा आणि इमारत बांधकामाशी संबंधित ऑडिट करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

‘व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीचीही चौकशी करा’

व्हेंटिलेटरच्या भूमिकेवरूनही अंधारे यांनी “शिलर कंपनीचे व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या व्यक्तीचे सरकारमधील कोणासोबत लागेबांधे आहेत का?” असा सवाल केला. संबंधित वैद्यकीय उपकरणाची खरेदी, पुरवठा, देखभाल आणि त्याच्या मेंटेनन्सचा तपशील तपासण्याची मागणी त्यांनी केली. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आग व्हेंटिलेटरमधून निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आमदार नितीन देशमुखांचा आरोग्य विभागाला जाब

दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांनी आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत प्रशासनाला जाब विचारल्याचे अंधारे यांनी सांगितले. दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासोबतच चौकशी पारदर्शक पद्धतीने करण्याची मागणी त्यांनी केली.

राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

अमरावती दुर्घटनेनंतर सरकारी रुग्णालयांच्या फायर सेफ्टी व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील ५३० कार्यरत सार्वजनिक आरोग्य संस्थांपैकी ५२८ संस्थांचे फायर ऑडिट झाले असल्याची सरकारी आकडेवारी आहे; मात्र फायर-सुरक्षा यंत्रणा बसविण्याचे काम ४४२ संस्थांमध्ये पूर्ण झाले असून केवळ ३७२ संस्थांकडे फायर NOC असल्याचे वृत्त आहे.

त्यामुळे केवळ ऑडिट झाले की नाही, यापेक्षा प्रत्यक्षात अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का, आपत्कालीन अलार्म-स्प्रिंकलर प्रणाली चालू आहे का, विद्युत यंत्रणा सुरक्षित आहे का आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीचे प्रशिक्षण आहे का, याचीही तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दुर्घटनेच्या वेळी अलार्म आणि स्प्रिंकलर यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

Web Title: Amravati womens hospital nicu fire sushma andhare demands action on civil surgeon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati News
  • maharashtra news
  • Shiv Sena UBT
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त
1

Jalgaon News: ज्वारी खरेदीला ब्रेक! चार दिवसांपासून केंद्र बंद, नोंदणीच्या घोळामुळे शेतकरी संतप्त

समलैंगिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला पोलिसांचा विवाह मोडला?
2

समलैंगिक असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिला पोलिसांचा विवाह मोडला?

Amravat Fire news: बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावती घटनेतील मृृृृृृत बालकाच्या बापाचा काळीज चिरणारा सवाल
3

Amravat Fire news: बाळ गेल्याचं आईला कुठल्या शब्दात सांगू? अमरावती घटनेतील मृृृृृृत बालकाच्या बापाचा काळीज चिरणारा सवाल

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
4

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.