
Jalgaon News: बांधकामाला आयुक्तांचा दणका! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Jalgaon Road Works: जळगाव शहरातील रस्त्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र त्यांनी महापालिकेची परवानगी न घेता परस्पर कामे केली आहेत. त्याबाबत तक्रारीही आल्या आहेत. आता रस्त्याची कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम वभागाला महापालिकेची ‘एसओसी ‘घ्यावी लागणार आहे. त्याबाबत आयुक्तांनी पत्र लिहून या विभागाला कळविले आहे. जळगाव शहरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ते दुरूस्तीसाठी विरोधकांनी आंदोलने केली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही मुख्यमंत्र्याकडे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी जळगावच्या रस्त्यासाठी अगोदर शंभर कोटी रूपये मंजूर केले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील अजिंठा चौफुली ते स्मशानभूमी, तसेच काव्यरत्नावली चौक ते शिवतीर्थ चौक, चित्रा चौक ते शिवतीर्थ चौक आदी मार्गावर सिमेट काँक्रीटच्या रस्त्याची कामे करण्यात आली आहेत. परंतु या कामाबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. संपूर्ण रस्त्याची कामे सदोष करण्यात आलेली आहेत. अजिंठा चौफुली ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता खाली वर बांधला आहे, वाहनधारकांना त्रास होत आहे. रस्ते बांधतांना पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला गटारी करण्याची आवश्यकता होती. परंतु ते सुध्दा करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नवीन बांधकाम कैलेल्या या सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्यावर पाण्याचे तलाव तयार होवून वाहतूकीस अडथळा होतो. Jalgaon News
शासनाने निधी मंजूर केला परंतु रस्ते दुरूस्तीचे काम महापालिकेकडे न देता ते शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले. मात्र त्यावर महापालिकेचे नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
शहरातील रस्त्याची कामे करतांना शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव शहर महापालिकेला कळवायला हवे होते. परंतु महापालिकेला कोणतीही माहिती न देता या विभागाने शहरातील रस्त्याची कामे परस्पर सुरू केली आहेत.
‘वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?’; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक
सार्वजनिक बांधकाम वभागाने बांधलेल शहरातील रस्ते सदोष आहेत. त्याचा दोष मात्र नागरीक महापालिकेवर काढत आहेत. पावसाळयात या रस्त्यावर पाणी साचल्यानंतर महापालिकेला धावपळ करून त्या पाण्याचा नचरा करून वाहतूक सुरळीत करावी लागली होती.