Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jat Patrakar Bhavan: जतमध्ये ‘पत्रकार भवना’चे थाटात भूमिपूजन; बांधकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – आ. गोपीचंद पडळकर

जत शहरात २० लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवन उभारले जात आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले असून बांधकामासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 08:47 PM
जतमध्ये 'पत्रकार भवना'चे थाटात भूमिपूजन

जतमध्ये 'पत्रकार भवना'चे थाटात भूमिपूजन

Follow Us
Follow Us:

 

  • जतमध्ये ‘पत्रकार भवना’चे थाटात भूमिपूजन
  • धकामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही
  • आ. गोपीचंद पडळकर यांची माहिती
Sangli News: जत शहरातील पत्रकारनगर येथे पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. आवश्यक असल्यास अतिरिक्त निधीही उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन गोपीचंद पडळकर यांनी केले.

जत येथील पत्रकारनगर परिसरात सुमारे अकरा गुंठे जागेत पत्रकार भवन उभारण्यात येत आहे. या कामासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमदार पडळकर यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यक्रमास नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी, पंचायत समिती सभापती सौ. अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, डॉ. शिवाजी खिलारे, रमेश देवर्षी, नगरसेवक परशुराम मोरे, विकास माने, योगेश बामणे, पालिका सभापती सुप्रिया बामणे, ठेकेदार आश्रय बन्नेणावर आदी मान्यवर उपस्थित होते.

Sangli News: ‘पीएम सूर्य घर’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा; खासदार विशाल पाटील यांचे महावितरणला निर्देश

यावेळी पत्रकार परिषदेच्या वतीने किरण जाधव यांच्या हस्ते आमदार पडळकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत परिषदेचे अध्यक्ष विजय रुपनूर यांनी केले, तर प्रस्ताविक ज्येष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे यांनी केले. यावेळी मारुती मदने, बादल सर्जे, प्रदीप कुलकर्णी, विठ्ठल ऐनापुरे, सोमनिंग कोळी, जॉकेश आदाटे, सुभाष कोकळे, नेताजी खरात, विजय नाईक, महेश गुरव, वीरपाक्ष येवले, नजीर चट्टरगी, गोपाल पाथरूट यांच्यासह पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार भवन दर्जेदार व्हावे – पडळकर

या पत्रकार भवनामुळे तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध होणार असून पत्रकारांसाठी ही महत्त्वाची पायाभूत सुविधा ठरणार आहे. कामासाठी अतिरिक्त निधी लागला तरी तो उपलब्ध करून दिला जाईल; मात्र बांधकाम दर्जेदार असावे आणि स्थानिक पत्रकारांना विश्वासात घेऊन काम पूर्ण करावे, अशा सूचना आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिल्या.

Sangli News: माजी खासदारांच्या गावात राजकीय भूंकप! चिंचणीचे लोकनियुक्त सरपंच सदाशिव माळी यांचा अचानक राजीनामा

Web Title: Jat patrakar bhavan foundation stone laid by mla gopichand padalkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:47 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • sangli news

संबंधित बातम्या

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज
1

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग; विशाल पाटील, डॉ. विश्वजीत कदम, देवराज पाटलांसह दिग्गजांचे अर्ज

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
2

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा
3

Sangli: पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’! तालुकानिहाय यंत्रणा सज्ज; चंद्रकांत पाटलांनी घेतला आढावा

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर
4

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.