Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : समर्थ मंदिर वाहतूक कोंडीवर तोडगा; बोगदा–समर्थ मंदिर रस्ता 15 मीटरने रुंद होणार

बोगदा ते समर्थ मंदिर दरम्यानचा रस्ता सुमारे 15 मीटरने रुंद करण्यात येणार आहे. यासाठी सातारा नगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पाहणी करण्यात आली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2026 | 04:57 PM
Joint inspection by Satara Municipal Council and Traffic Department to resolve traffic

Joint inspection by Satara Municipal Council and Traffic Department to resolve traffic

Follow Us
Follow Us:
  • समर्थ मंदिर चौकातील वाढती वाहतूक कोंडी सुटणार
  • पालिकेची व वाहतूक विभागाची संयुक्त पाहणी;
  • अतिक्रमणांवर कारवाईची शक्यता
Satara News : सातारा : समर्थ मंदिर चौकातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तोडगा काढण्यात आला आहे. बोगदा ते समर्थ मंदिर दरम्यानचा रस्ता सुमारे 15 मीटरने रुंद करण्यात येणार आहे. याच दृष्टीने सातारा नगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पाहणी करण्यात आली. या पाहणीत रस्त्याची प्रत्यक्ष मोजणी करून अतिक्रमणांची नोंद घेण्यात आली.

पालिकेचे नियोजन सभापती अशोक शेडगे, वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, अभियंता विनोद दहिफळे यांनी मुख्याधिकारी विनोद झळक यांच्या निर्देशानुसार ही पाहणी केली. सुमारे दीड तास चाललेल्या या पाहणीत बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा 15 मीटरपर्यंत मोजणी केली.

हे देखील वाचा : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हाय कोर्टाने फटकारले

या वेळी अनेक ठिकाणी घरांचे व गटारांवरील अतिक्रमण आढळून आले. बोगद्यापासून समर्थ मंदिराकडे येणाऱ्या रस्त्याचा तीव्र उतार, तसेच वाहतुकीची सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे नेण्यात येत आहे. यासाठी संबंधित अतिक्रमणधारकांना लवकरच नोटिसा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर समर्थ मंदिर परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन देत अतिक्रमणांवर कारवाई करताना केवळ एका भागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरात समान व कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे.

 

  • प्रकल्प: बोगदा–समर्थ मंदिर रस्ता रुंदीकरण
  • प्रस्तावित रुंदी: 15 मीटर
  • पाहणी कालावधी: सुमारे 1.5 तास
  • सहभाग: पालिका + वाहतूक विभाग
  • मुख्य उद्देश: वाहतूक कोंडी कमी करणे, सुरक्षितता वाढवणे
  • अडथळे: घरांचे व गटारांवरील अतिक्रमण
  • अतिक्रमणधारकांना लवकरच नोटीसा
हे देखील वाचा : ‘सर्वच आमदार-खासदार संपर्कात’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?

पाचगणी राज्य मार्गावरील करहर पूल वाहतुकीस खुला

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून जावळी तालुक्यातील पाचवड- पाचगणी राज्य मार्गावरील करहर नजीक असलेला पुलासाठी जवळपास ९९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार या पुलाचे काम बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. व हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. पुलाची उंची व रुंदी वाढल्याने वाहतूक सुरळीत होण्यास आता मदत होणार आहे.

पाचवड-पाचगणी राज्य मार्गावर वाहतुकीची वर्दळ वाढलेली पाहायला मिळते. पाचगणी,महाबळेश्वर पर्यटन स्थळांकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावरून दिवसेंदिवस वाहतूक वाढत चालली आहे.करहर नजीक मोठ्या ओढ्यावर असलेला पूल हा अरुंद व उंचीने कमी असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवली जावी अशी मागणी या विभागातील लोकप्रतिनिधी नागरिकांकडून होत होती. त्यानुसार बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या पुलासाठी निधी मंजूर केला होता.

Web Title: Joint inspection by satara municipal council and traffic department to resolve traffic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Road Traffic
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना
1

Satara News : सातारा-जावलीच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी
2

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील
3

ऊसाला हमीभाव देण्यापेक्षा साखरेला हमीभाव द्या; ना कर्जमाफीची गरज भासेल, ना साखर दराची चिंता राहील

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4

कराड MIDC तील प्रश्न आठ दिवसांत मार्गी लावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.