मुंबई : इंद्राणी मुखर्जीची मुलगी (Indrani Mukherjee, Daughter) विधी मुखर्जीने (Vidhi Mukherjee) आपल्या आईसोबत राहण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे (An application has been filed in the Central Bureau of Investigation (CBI) special court seeking permission to stay with his mother). आपण आईची साथ, प्रेम आणि जिव्हाळा यापासून वंचित आहोत, स्वतःच्या आईसोबत राहणे, आजारी आईची काळजी घेणे हा कोणत्याही मुलांचा मूलभूत अधिकार आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
२०१५ रोजी शिना बोराच्या हत्येप्रकरणी (Sheena Bora Murder Case) तिची आई इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी इंद्राणीची मुलगी विधी ही साक्षीदार आहे. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) इंद्राणीला अटीशर्तींसह जामीन मंजूर केला होता.
[read_also content=”मुंबईतील गणेशोत्सव सुरक्षितपणे व सुखरूप पार पडावा यासाठी ‘हे’ निभावत आहेत महत्त्वाची जबाबदारी https://www.navarashtra.com/technology/godrej-security-solutions-are-playing-an-important-responsibility-to-ensure-that-ganeshotsav-2022-in-mumbai-is-conducted-safely-and-smoothly-nrvb-321552.html”]
जामीन अटींपैकी तिने या खटल्यातील इतर साक्षीदारांशी संवाद साधू नये, अशी एक अट होती. दुसरीकडे, इंद्राणीची मुलगी विधी येत्या १० सप्टेंबरला भारतात परतणार आहे. मागील अनेक वर्षांपासून ती परदेशात होती. विधीने ॲड. रणजित सागळे यांच्यामार्फत विशेष सीबीआय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
आईला (इंद्राणी) २०१५ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. मात्र, आईला अटक झाल्यापासून आपण आईची साथ, प्रेम आणि जिव्हाळा यापासून वंचित आहोत. मागील सात वर्षांमध्ये माझ्या भावनिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. आईपासून लांब राहणे कठीण जात आहे म्हणूनच तिला आईसोबत मुक्तपणे संवाद साधता आणि जगण्याची विनंती, अर्जातून केली आहे.
[read_also content=”दीड दिवसाच्या गणरायाला आज भाविकांनी दिला भावपूर्ण निरोप https://www.navarashtra.com/photos/ganeshotsav-2022-ganpati-immersion-devotees-bid-a-heartfelt-farewell-to-ganpati-bappa-after-one-and-a-half-days-nrvb-321539.html”]
विधीशिवाय इंद्राणीचे मुंबईत कोणीही नाही. अर्ज मंजूर झाल्यास त्याचा खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. सात वर्षांनी विधीला आईसोबत राहता येईल. मात्र, अर्ज नामंजूर झाल्यास विधीचे कधीही भरून न येणारे नुकसान सोसावे लागेल हे तिच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.
तसेच इंद्राणी या सेरेब्रल इस्केमियाने या गंभीर आजारने त्रस्त असून तिला वैद्यकीय मदत आणि योग्य काळजी आवश्यक आहे. एक मुलगी म्हणून आपण तिची काळजी घेऊ शकतो, असेही विधीने याचिकेत नमूद केले आहे. त्यावर विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत सुनावणी ७ सप्टेंबर रोजी निश्चित केली.






