Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara: “शिवरायांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचे प्रयत्न”; राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असा आरोप राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी केला आहे. साताऱ्यात 'शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम'चे स्वागत करताना त्यांनी हा संताप व्यक्त केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 26, 2026 | 10:09 PM
राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप

राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप

Follow Us
Follow Us:

 

  • “शिवरायांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचे प्रयत्न”
  • राजमाता कल्पनाराजे भोसले यांचा NCERT वादावर संताप
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे तसेच त्यांच्या कार्यावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एनसीईआरटीकडून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या कथित प्रयत्नावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांवरही पडदा पडू शकतो आणि सध्या तोच प्रयत्न सुरू आहे.”

राजधानी सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांविषयी समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचा आरोप केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान, स्वराज्य स्थापनेसाठीचे त्यांचे कार्य आणि सर्वधर्मसमभावाची भूमिका नव्या पिढीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्राचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा अभिमान आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याबाबत कोणतीही दिशाभूल सहन केली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शिवचरित्राचा खरा इतिहास जपावा, अभ्यासावा आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दारूबंदीच्या जावळी तालुक्यात दारूची विक्री जोमात; नवीन पोलीस अधिक्षकांनी लक्ष देण्याची गरज

दरम्यान, पुण्यातील दिग्विजय प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवचरित्र प्रसार अश्वमोहीम’चे रविवारी साताऱ्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. गेली २५ वर्षे इक्वेस्ट्रीयन हॉर्स रायडिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक श्री. गुणेश पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही अनोखी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात १७ एप्रिल रोजी ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावरून झाली असून १० मे रोजी रायगड येथे समारोप होणार आहे. महाराष्ट्रातील २५ किल्ल्यांना अश्वारोहण करत भेट देत शिवचरित्राचा प्रसार आणि तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

रविवारी सकाळी अश्वारोहक साताऱ्यात दाखल झाले. ऐतिहासिक शाहूनगरीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जलमंदिर पॅलेस येथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या शुभहस्ते स्वागत सोहळा पार पडला. यावेळी भाजपा सातारा जिल्हा लोकसभा संयोजक सुनीलतात्या काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर, नगरसेवक पंकज चव्हाण यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्यात रंगणार १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; जेएनयूच्या प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Web Title: Kalpanaraje bhosale on ncert maratha empire map controversy satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Satara

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले
3

Sajjangad : ब्लास्टिंगचा दणका अन् सज्जनगड घाट ठप्प! दरड कोसळल्याने शेकडो भाविक-पर्यटक अडकले

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा
4

जिथे गणरायाच्या जागी विराजमान होतात ‘देवधिदेव महादेव’; साताऱ्यातील पवार वाड्याची आगळीवेगळी परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.