कल्याण : एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकल्याच्या (Stuck In Elevator) भीतीने (Fear) सहाव्या मजल्यावरून उतरण्याचा (Down From 6th Floor) प्रयत्न करत असतानाच चालत्या लिफ्टमधून (Running Lift) तोल जाऊन (Fall Down) थेट लिफ्टच्या खड्यात (Elevator Pit) पडून १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू (13 Year Boy Death) झाल्याची धक्कादायक घटना (Shocking Incident) समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम (Kalyan West) भागातील गांधारे गावात (Gandhare Gaon) असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station Kalyan) अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हिमांशु कनोजिया ( वय १३) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मृतक हिमांशु यांच्या वडिलांचे गांधारे गावात असलेल्या रिध्दी सिध्दी सोसायटी जवळच लाॅन्ड्रीचे दुकान आहे. मृत हिमांशु आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करून तो परिसरातील सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांचे कपडे इस्त्रीसाठी आणून त्यांना पुन्हा देत असे. अशाच प्रकारे बुधवारी ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशाचे इस्त्री केलेले कपडे लिफ्टमधून घेऊन गेला होता. त्यानंतर कपडे देऊन पुन्हा तो खाली जाण्यासाठी लिफ्टमध्ये आला.
[read_also content=”वाढीव वीज बिल आंदोलन प्रकरण : राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढांविरोधात आरोप निश्चित, सर्व आरोपींच्या उपस्थितीत विशेष न्यायालयाचा निर्णय; सर्वांकडून आरोपाचे खंडन https://www.navarashtra.com/maharashtra/higher-electricity-bill-agitation-case-charges-fixed-against-rahul-narvekar-and-mangalprabhat-lodha-verdict-of-special-court-in-presence-of-all-accused-denial-of-the-allegation-by-all-nrvb-395058.html”]
तेव्हाच लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लिफ्ट पाचव्या – सहाव्या मजल्याच्या मध्ये अचानक थांबली होती. त्यामुळे मृत हिमांशूला वाटले की, आता आपण लिफ्टमध्ये अडकून राहू या भीतीने लिफ्टचा दरवाजा त्याने उघडताच लिफ्ट सुरु झाली आणि त्याच सुमारास त्याचा लिफ्टमधून तोल जाऊन तो सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या खड्यात पडून जागीच मृत्यू झाला.
दुसरीकडे सायंकाळी ग्राहकांच्या घरी इस्त्रीचे कपडे घेऊन गेलेला हिमांशू बराच वेळा झाला तरीही लाॅन्ड्रीच्या दुकानात परत आला नव्हता. त्यामुळे त्याचे वडील आणि नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. दरम्यान रात्रीच्या सुमारास रिध्दी सिध्दी सोसायटीच्या इमारतीमधील लिफ्टच्या खड्यात मुलगा पडल्याचे त्यांना समजले. त्यानंतर वडील आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन लिफ्टच्या खड्यात हिमांशूला रक्ताच्या थारोळ्यात पाहताच त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र तेथे डाॅक्टरांनी उपचार करण्यापूर्वीच मृत घोषित केल्याने कनोजिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तर या दुर्घटनेमुळे सोसायटीतील रहिवासी हळहळ व्यक्त करीत होते.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 4 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-4-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]