Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

kalyan News: कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल; सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात बोधगयाच्या धर्तीवर भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या या प्रकल्पामुळे कल्याणच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 13, 2026 | 12:14 PM
कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल; सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना

कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल; सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना

Follow Us
Follow Us:
  • कल्याणच्या वालधुनीत उभारणार भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल
  • सांस्कृतिक-धार्मिक विकासाला चालना
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञानकेंद्र येथे आनंदोत्सव साजरा
kalyan News Marathi : कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसर आता जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणाऱ्या एका ऐतिहासिक प्रकल्पाचा साक्षीदार ठरणार आहे. बोधगयाच्या धर्तीवर भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून या प्रकल्पासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर सकल बौद्ध समाजाच्या वतीने कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्ञानकेंद्र येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

Kalyan Crime: व्हॉट्सअॅप स्टेटसच्या वादातून कल्याणमध्ये गोळीबार! तरुणावर फायरिंग केल्यानंतर आरोपीने स्वतःवरच झाडली गोळी

कल्याण पूर्वेतील वालधुनी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुलामुळे कल्याण शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. बुद्धभूमी फाउंडेशनने या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विविध मागण्यांना राज्य शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची संकल्पना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून साकार होत असल्याचे सांगण्यात आले. या संकुलामध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम, ध्यान केंद्र, अध्ययन केंद्र हॉस्पिटल,कॉलेज तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्याचा मानस आहे.

यावेळी सकल बौद्ध समाज डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत हा प्रकल्प केवळ बौद्ध समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत शिवसेना शिंदे गट प्रवक्ते किरण सोनावणे कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे शिवसेना नगरसेवक आणि विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी व्यक्त केले. वालधुनी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुलामुळे कल्याणच्या विकासाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार असून या प्रकल्पाकडे संपूर्ण शहरासह बौद्ध समाजाचे लक्ष लागून आहे.

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुलात भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडवणारे विशेष दालन, ध्यान व साधना केंद्र, अध्ययन आणि संशोधन केंद्र, हॉस्पिटल, कॉलेज तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध सुविधा उभारण्याचा मानस आहे. देश-विदेशातील बौद्ध अनुयायी आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनू शकते. या प्रकल्पामुळे कल्याण परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच रोजगारनिर्मिती, स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक आणि बौद्ध समाजाकडून व्यक्त केला जात आहे.

Kalyan: महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, आठवडाभरात सुधारणा न झाल्यास आंदोलन

Web Title: Kalyan valdhuni international mahabodhi complex buddhist tourism development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Shambhuraj Desai : ‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू’ शंभूराज देसाईंचा महायुतीला घरचा आहेर
1

Shambhuraj Desai : ‘येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू’ शंभूराज देसाईंचा महायुतीला घरचा आहेर

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी
2

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन
3

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक
4

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.