Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : जलजीवन मिशन योजनेसाठीचे पाईप जळून खाक; आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट

नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 06:13 PM
Karjat News : जलजीवन मिशन योजनेसाठीचे पाईप जळून खाक; आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट
Follow Us
Follow Us:
  • जलजीवन मिशन योजनेसाठीचे पाईप जळून खाक
  • आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट
कर्जत/संतोष पेरणे :  तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम समजली जाणारी नेरळ नळपाणी योजनेचे काम अनेक वर्षे सुरू आहे. अनेक वर्ष रखडलेल्या या नळपाणी योजनेचे मोहाची वाडी येथे पडून राहिलेले पाईप तेथे लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. त्यामुळे आता नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना संकटात आली असून या आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते.

नेरळ ग्रामपंचायतचे 40 कोटींच्या जलजीवन मिशन मधील प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. या योजनेचे काम अनेक वर्षे रखडले असून योजनेच्या कामासाठी आणलेले काळया रंगाचे पाईप मोहाची वाडी येथे आणून टाकण्यात आले होते. नेरळ जवळील मोहाची वाडी परिसरात जलजीवन मिशनच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाईपचा साठा करून ठेवण्यात आला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील गवताने अचानक पेट घेतला.

Karjat News : “चीन घुसखोरी करताना मोदींची 56 इंच छाती जाते कुठे?” राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची सणसणीत टीका

‘जल जीवन मिशन’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी आणून ठेवलेल्या पाईपच्या साठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मोहाची वाडी येथील मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आलेल्या ते पाईप सुक्या गवताला लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाले आहेत. ही आग वाऱ्यामुळे वेगाने पसरली आणि थेट पाईपच्या साठ्यापर्यंत पोहोचली. पाईप प्लॅस्टिकचे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आणि काही वेळातच मोठ्या प्रमाणात साठा जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्मचाऱ्यांनी तात्काळ पाण्याचे टँकर मागवले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आगीचा प्रसार अधिक होण्यापासून रोखला गेला आणि मोठा अनर्थ टळला.

दरम्यान,या आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, घटना स्थळावरील दृश्य पाहता मोठ्या संख्येने पाईप निकामी झाले असून योजनेच्या कामाला यामुळे खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेरळ गावची पश्चिम दिशेला मोहाची वाडी असून येथे हे पाईप ठेवण्यात आले होते,त्या पाईप यांना आग लागल्याने नेरळ गावावर काळया रंगाच्या धुराच्या लोट यांनी वातावरण भरून गेले होते.

Raigad News : गतिरोधक नसल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ; प्रशासनाच्या हलगर्जिपणावर नागरिक आक्रमक

Web Title: Karjat news pipe for jaljeevan mission scheme burnt to ashes smoke billows in neral area due to fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.