Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण

बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील 'पतंजली फूड्स'ला मोठा धक्का बसला आहे. पतंजलीच्या पिठामध्ये कीटकनाशकांचे प्रमाण आढळल्याने ते बाजारातून तात्काळ परत मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईच्या वृत्तानंतर शेअर बाजारात पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 27, 2026 | 03:36 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक!
  • बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश;
  • शेअर्समध्ये मोठी घसरण
Patanjali Atta Controversy : बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्स कंपनीवर मोठं संकट कोसळल्याचं समोर येत आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्याचा परिणाम कंपनीच्या इमेजसह शेअरवरही मोठ्या प्रमाणावर होताना दिसला. आज, २७ जुलै रोजी शेअर बाजारात या शेअर्सची मोठी घसरण दिसून आली आहे. कंपनीला गव्हाच्या पिठाची एक बॅच परत मागवण्याचे निर्देश देणाऱ्या न्यायालयाच्या आदेशानंतर ही घसरण झाली आहे. नेमकं काय घडलं? प्रकरण काय आहे? सविस्तर समजून घेऊयात.

Bank Holidays August: बँकेची कामं आताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये बरेच दिवस बँका राहणार बंद? पाहा डिटेल्स

पतंजलीच्या पिठात कीटकनाशके

केरळमधील कोट्टायम अन्न सुरक्षा प्राधिकरणाने केलेल्या तपासणीत पिठाच्या बॅचमध्ये क्लोरपायरीफॉस या कीटकनाशकाचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा खूप जास्त आढळले. कंपनीने २४ जुलै रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गव्हाच्या पिठाच्या एका बॅचमध्ये परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशकाचे अवशेष आढळले, ज्यामुळे पतंजली फूड्सला ती बॅच परत मागवावी लागली.

पतंजली फूड्सच्या स्पष्टीकरणात काय?

पतंजली फूड्सने सांगितले की, त्यांना २४ जुलै रोजी केरळमधील कोट्टायम येथील अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयातून रिकॉल ऑर्डर मिळाला. त्यानंतर माल परत मागवण्याचा आदेश देण्यात आले. कंपनीने सांगितले की, २० जुलै रोजीचा हा आदेश त्यांना २४ जुलै रोजी मिळाला. कंपनीने असेही म्हटले आहे की, ही समस्या केवळ गव्हाच्या पिठाच्या एका विशिष्ट बॅचशी संबंधित आहे आणि त्याचा कंपनीच्या इतर उत्पादनांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

क्लोरपायरीफॉस म्हणजे काय?

हे एक ऑर्गनोफॉस्फेट कीटकनाशक आहे, जे पिकांमधील कीटक मारण्यासाठी वापरले जाते. अन्नातून याचे अतिरिक्त प्रमाण घेतल्यास मज्जासंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याच्या अतिसेवनामुळे चक्कर येणे, डोकेदुखी आणि पोट खराब होणे यांसारखे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे हे बरंच घातक ठरु शकतं. या सगळ्याचा घातक परिणाम होऊ नये यासाठी हे धोक्याचं ठरु शकतं.

शेअरच्या किमतीत मोठी घसरण

गव्हाच्या पिठात कीटकनाशके आढळल्याची आणि काही बॅचेस परत मागवल्याच्या बातमीचा परिणाम आज पतंजली फूड्सच्या शेअर्सवर होत आहे. या बातमीनंतर, पतंजली फूड्सचे शेअर्स ₹५५२ च्या उच्चांकावरून घसरून प्रति शेअर सुमारे ₹३४४ वर आले. ही ₹२०८.५५ ची घसरण आहे. याचा अर्थ, स्टॉक त्याच्या उच्चांकावरून ३७.७४% ने खाली आला आहे. त्याचा ५२-आठवड्यांचा नीचांक ₹३२८.२० आहे, म्हणजेच स्टॉक सध्या त्याच्या नीचांकाच्या अगदी जवळ आहे.

धमाका… SBI च्या IPO ने बदललं शेअर बाजाराचं चित्र! जुलै महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून तब्बल 42000 कोटींची गुंतवणूक

Web Title: Patanjali atta recalled due to pesticides patanjali foods shares fall marathi article

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Baba Ramdev
  • Business News
  • FSSAI
  • Marathi News
  • patanjali
  • Patanjali Group

संबंधित बातम्या

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल
1

Global Fintech Fest 2026 : जमीन-मालमत्तेचे होणार ब्लॉकचेन टोकनायझेशन; महाराष्ट्र सरकार उचलणार मोठे पाऊल

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
2

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड
3

बांधकाम आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी मोठी बातमी! गंज लागण्याची चिंता मिटणार; AM/NS ने लाँच केला Pelican ब्रँड

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
4

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.