Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

वाकस गावाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरून दिवसरात्र सांडपाणी वाहत असते. रस्त्यावरून वाहणारे सांडपाण्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात असून देखील प्रशासन मात्र यासगळ्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 24, 2026 | 12:46 PM
Karjat News : राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य; रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट, प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यमार्ग की घाणीचं साम्राज्य;
  • रस्त्यावरुन वाहत आहेत सांडपाण्याचा लोट,
  • प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील उरण-पनवेल-नेरळ- भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या वाकस गावाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावरून दिवसरात्र सांडपाणी वाहत असते.रस्त्यावरून वाहणारे सांडपाण्याने स्थानिकांचे आरोग्य धोक्यात असून देखील प्रशासन मात्र यासगळ्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच सांडपाण्याने ओल्या राहणाऱ्या रस्त्यावरून शाळांचे विद्यार्थी देखील पायपीट करीत असतात,मात्र तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाला त्याचे काही देणे घेणे नसल्याची संतप्त प्रतिक्रीया गावकऱ्यांनी दिली आहे.

Karjat News: कशेळेकरांच्या संघर्षाला यश! कर्जत-मुरबाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात

वाकस गावामधून जाणाऱ्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. नेरळ कशेळे हा मार्ग भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता. या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. नेरळकडून कशेळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाकस येथे आदिवासी वाडीमधून येणारे सांडपाणी वाहत वाहत रस्त्याने जाते. त्यात भरीला भर म्हणजे गुरांचं शेण आणि घरातील कचरा देखील उघड्यावर टाकला जातो. यासगळ्याने हा राज्यमार्ग नव्हे तर घाणीचं साम्राज्य झालं आहे. या सगळ्याचा त्रास वाहनांचा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना देखील होत आहे.

नेरळ कशेळे मार्गावर वाकस येथे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तेथील आदिवासीवाडीमधून येणारे सांडपाणी हे रस्त्याच्या बाजूने गटार काढून ते सांडपाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी स्थानिक ग्रामपंचायतकडून घेण्याची गरज आहे. या समस्येवर कोणीही आवाज उठवायला तयार नाही असं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे.या सांडपाण्याचा स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालक यांना त्रास तर होत आहेच,लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता देखील लवकर खराब होण्यास कारणीभूत ठरत आहे.

वाकस येथील आदिवासीवाडी मधून येणारे सांडपाणी हे रस्त्यावरती न येण्यासाठी वाकस ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ व ग्रामपंचायत मध्ये असलेले प्रशासक यांना या समस्येबाबत आपली कैफियत सांगितले.त्यावेळी प्रशासक यांच्याकडून ग्रामसभेमध्ये या सांडपाण्याबाबत नियोजन करण्यात आले नाही. या सांडपाण्याकडे वाकस ग्रामपंचायत मधील प्रशासक यांच्याकडून वारंवार सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्याचे काम केले जात आहे. रस्त्यावर येणारा सांडपाणी आणि वर्षानुवर्षे सांड पाण्यातून होणारा प्रवास कधी संपणार असाही प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

 

Web Title: Karjat news sewage problem in the limits of wakas village on neral bhimashankar state highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता
1

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास
2

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप
3

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप
4

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.