Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल

Karjat News : तालुक्यात प्रचंड कडाक्याच्या उन्हाने सर्वत्र पाण्याचे टंचाई वाढली आहे. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आजच्या घडीला तालुक्यात 7 गावे आणि 21 वाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 06:41 PM
Karjat News

Karjat News

Follow Us
Follow Us:

 

  • ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ;
  • कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात प्रचंड कडाक्याच्या उन्हाने सर्वत्र पाण्याचे टंचाई वाढली आहे. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आजच्या घडीला तालुक्यात 7 गावे आणि 21 वाड्या यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.दरम्यान पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी वाढत असल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली असून 13 टँकर यांचा वापर सध्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जात आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते.मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते,तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठया नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते.त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधी अभावी रखडल्या आहेत.हे लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडा डिसेंबर 2025 मध्ये तयार करण्यात आला आहे.यावर्षी कर्जत तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या या पाणीटंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

Karjat News : सरकारी रस्ता हडप करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ? नगरपरिषदेच्या विरोधात शरद पवार गटाचं उपोषण

गावात भीषण पाणीटंचाई

या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरचे माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत मधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता.यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे.शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती,त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी 13 टँकर मंजूर झाले असून त्या टँकर मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही 14 हजार लिटर एवढी आहे.त्या टँकर मधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकर ने पाणी पुरवठा केला जाणार आहे.आज तालुक्यातील सात गावे आणि 13 वाड्या यांना टँकर मधून पाणी दिले जात आहे.तालुक्यातील पेज आणि उल्हास नदी मधून पाणी उचलले जात आहे.

कर्जत तालुक्यातील आशाणे, कोषाने,पळसदरी,पाथरज, मोगरज,खानंद,धामणी या सात गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.तर किरवली ठाकूरवाडी,सावरवाडी ठाकूरवाडी,पळसदरी ठाकूरवाडी,वर्णे ठाकूरवाडी, चिमटे वाडी,जांभूळ वाडी, झुगरेवाडी, किरवली, पेटारवाडी,लोभेवाडी, पिंगळस,फणसवाडी,भक्तची वाडी, सराईवाडी,पाच खडकवाडी, मोहपाडा, मेचकरवाडी, धोत्रेवाडी आणि बणाचीवाडी या 21 वाड्या मध्ये शासकीय टँकर मधून पाणी पुरवठा केला जात आहे.

Karjat News : ग्रामीण भागात सरकारी रुग्णवाहिकेची गैरसोय; विषबाधेमुळे रुग्णाला ॲम्बुलन्स मिळता मिळेना

Web Title: Karjat news water crisis in summer the villagers of karjat taluka are suffering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navarashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस
1

Bharat Gogawale : ‘रायगडचं डिक्लेरेशन घेण्यासाठी..’; भरत गोगावलेंची मिश्किल टिप्पणी, पालकमंत्रिपदावरून महायुतीत पुन्हा धुसफूस

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
2

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
3

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
4

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.