Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक

पावसाने केलेल्या भाताच्या शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याच्या मागणी करत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 09, 2025 | 02:09 PM
Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:
  • मुसळधार पावसाने भातशेतीचं मोठं नुकसान
  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ?
  • कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक

कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील खरीप हंगामात केलेल्या भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.सरत्या पावसाने केलेल्या भाताच्या शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली. शिवसेना ठाकरे पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते शेतीच्या नुकसानाबद्दल भरपाई देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून आले.

कर्जत तालुक्यातील भाताच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर सरत्या पावसामुळे नुकसान झाले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कर्जत तहसील कार्यालय गाठून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपल्या मागणीचे निवेदन दिले.यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत,कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे,तालुका संघटक बाबू घारे,तसेच उपतालुका प्रमुख ॲड प्रमोद सुर्वे,नितीन धुळे,बाजीराव दळवी,तालुका संघटक पांडुरंग बागडे तसेच विभाग प्रमुख भगवान बांगर,दिनेश भासे,मिलिंद सोनवले,रमेश भुसाल तर युवासेनेचे ॲड संपत हडप,नरेश मिनमीने,सतीश सावंत,साहिल मगर आणि करण धस, लालू शाह आदीसह शेतकरी उपस्थित होते. शिवसेना ठाकरे पक्षाने दिलेल्या निवेदनात विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी पूर्वीच्या अन्य आताच्या सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते.पण जवळपास एक वर्ष उलटुनही याविषयावर कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही याकडे लक्ष वेधले.

खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर! तीनही वीज कंपन्याचा डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार

शेतीचे संपूर्ण राज्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत व्हावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने पुन्हा उभारी देण्यासाठी सरसकट कर्जमुक्ती हीच तातडीची आणि परिणामकारक उपाययोजना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातुन कर्जमुक्त करावे.पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतक-यांच्या खात्यात जमा करावी.अतिवृष्टीमुळे घरे आणि पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना, जुने निकष न लावता, योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी शिवसेना पक्षाने केली.

राज्यातील शेतकरी सततच्या नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, उत्पादन खर्चातील वाढ महागडी खते, औषधे यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पीकांचे भाव हमी भावापेक्षा कमी मिळत असून उत्पादन खर्च वसूल करणे देखील कठीण झाले आहे. शेतकरी व ग्रामीण भागाचे उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या शेतीतील उत्पन्नाला हमीभाव,योग्य बाजार नसल्याने बहुतांश शेतकरी बँक व सावकाराकडील कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अनेकांना थकबाकीमुळे नोटीसा, जप्ती कार्यवाही, काहीकडून तर आत्महत्येचे टोकावे निर्णय घेतले जात आहे. दिवसेंदिवस त्याचे आकडे वाढत आहे.ही कर्जमुक्ती सर्व प्रकारच्या कर्जावर, यामध्ये थकबाकीदार, चालू बाकीदार यांच्यासह अल्प मुदतीचे पीक कर्ज, मध्यम मुदतीचे सिंचन व उपकरण कर्ज, शेडनेट, पॉलीहाऊस, दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेले तसेच सावकारी कर्ज यात समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला ‘अंतिम’ इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

Web Title: Karjat news when will the affected farmers get help thackeray group is aggressive in karjat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • karjat news
  • maharashtra poliotics
  • Raigad News

संबंधित बातम्या

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील
1

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Karjat News : 60 दिवसांपासून ‘या’ विभागात डॉक्टरच नाही; ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचे तीन तेरा
2

Karjat News : 60 दिवसांपासून ‘या’ विभागात डॉक्टरच नाही; ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचे तीन तेरा

Raigad News : आजरपणाने ग्रासलं पण पठ्याने हार नाही मानली; पॅरा ऑलिम्पिक स्विमर ऋषिकेशची कहाणी
3

Raigad News : आजरपणाने ग्रासलं पण पठ्याने हार नाही मानली; पॅरा ऑलिम्पिक स्विमर ऋषिकेशची कहाणी

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन
4

Raigad News : दिवाळीपूर्वी रस्ता दुरुस्त करा अन्यथा… ; प्रशासनाच्या विरोधात शेकापचं रास्ता रोको आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.