Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Heavy Rain : कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली

कर्जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठा पूर आला असून मोहिली, दहिवली-मालेगाव, शेलू आणि पाषाण येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली असून नेरळ-कळंब मार्ग ठप्प झाला आहे. प्रशासनाने नागरिकांना पूल ओलांडू नये, असे आवाहन करत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 12:09 PM
कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली

कर्जतमध्ये मुसळधार पावसाचा कहर; उल्हास नदीला पूर, चार पूल पाण्याखाली

Follow Us
Follow Us:
  • उल्हास नदी दुथडी भरून वाहिली
  • मोहिली, दहिवली, शेलू आणि पाषाण पूल जलमय, वाहतूक ठप्प
  • उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली, अनेक मार्ग बंद
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील मोहिली, दहिवली-मालेगाव, शेलू आणि पाषाण येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नेरळ ते कळंब-पाषाण परिसरातील अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सोमवारी (6 जुलै 2026) रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हास नदीसह चिल्हार आणि पेज नद्यांनाही पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत गेल्याने सर्वप्रथम मोहिली येथील पूल पाण्याखाली गेला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुरक्षा कठडे उभारले आणि वाहतूक पूर्णपणे बंद केली.

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

यानंतर उल्हास नदीवरील दहिवली-मालेगाव पूलही पाण्याखाली गेला. या ठिकाणी दहिवली गावाचे पोलीस पाटील अनिल बारणेकर यांनी स्वतः पुलाच्या दहिवली बाजूला उभे राहून नागरिकांना पुलावरून जाण्यापासून रोखले. वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक बनले होते.

दरम्यान, दहिवली येथे सुमारे २५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाच्या वरूनही पूराचे पाणी वाहत असल्याचे चित्र समोर आले आहे. अद्याप पूर्णत्वास न आलेल्या या पुलावरून पाणी गेल्याने त्याच्या रचनेबाबत आणि पूरनियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. धामोते बाजूला पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कोणालाही पुलावरून जाण्यास मज्जाव केला, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

दुसरीकडे, नेरळ-कळंब मार्गावरील वाहतूकही रात्रीपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. गेल्या वर्षी उल्हास नदीवर शेलू येथे बांधण्यात आलेल्या नव्या पुलावरूनही पूराचे पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने हा मार्गही बंद केला. शेलू गावाचे पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, उल्हास नदीचे पाणी शेलू गावातील नदीकाठच्या चाळींमध्येही शिरल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील पाषाण येथील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मोहिली, दहिवली, शेलू आणि पाषाण हे चारही पूल पाण्याखाली गेल्याने नेरळपासून कळंब आणि पाषाणपर्यंतच्या अनेक गावांचा परस्पर संपर्क तुटला आहे.

प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पूरग्रस्त भागात अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…

Web Title: Karjat ulhas river flood bridges submerged heavy rain neral shelu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • Karjat
  • Maharashtra Monsoon

संबंधित बातम्या

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार
1

Weather Forecast: IMD चा नवा अंदाज, आठवडाभराच्या धुमाकूळानंतर पाऊस विश्रांती घेणार; ‘या’ तारखेपर्यंत जोर ओसरणार

Karjat News :  Torrent Hydropower Project साठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप
2

Karjat News :  Torrent Hydropower Project साठी सुरू असलेल्या ड्रिलिंगमुळे पर्यावरण धोक्यात? कर्जतमध्ये ग्रामस्थांचा संताप

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान
3

मुसळधार पावसाचा कहर, निसरेफाटा, एफिल, रासे परिसर जलमय; घरांमध्ये व दुकानगाळ्यांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान

Maharashtra Rain Alert: पावसाचा धुमाकूळ सुरूच; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी
4

Maharashtra Rain Alert: पावसाचा धुमाकूळ सुरूच; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.