फोटो सौजन्य सोशल मडिया
Farmmers Impact On Kharif Crops : यंदा राज्यात पावसाचे प्रमाम कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट झाली आहे. जळगाव चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर मोठा परिणाम झाल्याने मक्याच्या उत्पादनावर मोठी घट झालेली दिसून येत आहे. या सर्वांचा फटका मक्याच्या दर वाढीवर आणि दाणे भरणीवर परिणाम झाला आहे.
शेतकरी आपल्या शेतातला मका विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्ये घेऊन येत आहेत. पण जळगाव येथिल चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मका आणि सोयाबीनची आवक होत आहे.सध्या बाजार समितीत सोयाबीनची सुमारे 250 क्विंटलपर्यंत, तर मक्याची सुमारे 2 हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाअभावी मका आणि सोयाबीनची आवक कमी असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मका आणि सोयाबीन तसेच इतर उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मका आणि सोयाबीनची आवक कमी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत मध्ये मक्याला 1700 ते 2000 हजार दराने भाव मिळत आहे. तसेच सोयाबीनला 05 हजार ते 5800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतकऱ्यांनी दिली आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट झाली. जळगाव येथील चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांवर याचा मोठा परिणाम झाल्याने, मागिल वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी मक्याची आवक कमी झाली; यामुळे मक्याच्या उत्पादनावर याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी मक्याच्या आवक कमी झाली असून याचा परिणाम आता ज्वारी बाजरी मूग या उत्पादनावर दिसत आहे.






