Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ

Kolhapur News :  हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या ३-४ दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2026 | 07:13 PM
Kolhapur News

Kolhapur News

Follow Us
Follow Us:
  • वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला;
  • अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ
हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या ३-४ दिवसांत राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. महाड तालुक्यातील जिते, खैराट, टेमघर, बिरवाडी, खरवली गावातील घरांवरील छप्पर उडून मोठे नुकसान झाले.

यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथे झालेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कोलाम वस्तीतीला जोरदार तडाका बसला.दरम्यान, शुक्रवारी गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, लातूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. राज्यात मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली असली, तरी मुंबईकरांना पावसाचा आनंद लुटता येणार नाही. दमट हवामानाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur News : खरीप हंगामापूर्वीच अडवणूक; खतविक्रेत्यांच्या संपामुळे शेतकरी सापडला कोंडीत

कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस
घाट माध्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांना गुरुवारी पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर आजरा, चंदगड, गडहिंग्लज, संकेश्वरसह परिसरात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. सकल भागात पाणी झाल्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली होती. तर शेत शिवारांमध्ये पाणी साचले होते.दरम्यान, रात्री उशिरापर्यंत काही भागात पावसाच्या तुरळक सरी सुरुव होत्या. या पावसाने काही घरांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. गारगोटी परिसरात वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; सहा जखमी
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील वडगाव येथे वादळी वाऱ्यामुळे ग्रामपंचायतीचा सोलर खांब वीज वाहिन्यांवर कोसळून अपघात झाला. सोलर खांब कोसळल्याने वीज वाहिन्या तुटून थेट लग्न मंडपावर पडल्या. त्यामुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला. या अपघातात सहा जण जखमी झाले. तर विजेचा शॉक लागून काही जण किरकोळ जखमी झाले. सोलर खांब अंगावर पडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी महिलांना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यासह पाऊस
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Kolhapur News : दूध संस्थांच्या सुनावणीत दिरंगाई ; ‘गोकुळ’च्या ठरावांवरून राजकारण तापले

Web Title: Kolhapur news wedding pavilion collapsed due to storm kolhapur residents stranded due to unseasonal rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • Unseasonal Rain

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.