Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

कोल्हापुरात पारा 36 अंशांवर गेला असून पुणे, सातारा, सांगलीतही उष्णतेची लाट पसरली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 38 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 07:02 PM
Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल
Follow Us
Follow Us:
  • पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला!
  • कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका सातत्याने वाढत असून, कोल्हापूरसह संपूर्ण विभागात तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे कोल्हापूरकरांना घामाच्या धारांनी ग्रासले आहे. कोल्हापुरात पारा 36 अंशांवर गेला असून पुणे, सातारा, सांगलीतही उष्णतेची लाट पसरली आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 38 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अरबी समुद्रातील आर्द्रता आणि ‘लोकल विंड’चा परिणाम
● कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत तापमानाचा पारा 36 अंशांवर असला, तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर गेल्याने प्रत्यक्षात उष्णतेची दाहकता अधिक जाणवत आहे. अरबी समुद्राकडून येणा-या बाष्पयुक्त वाऱ्याऱ्यांमुळे कोल्हापूर आणि साताऱ्यात ‘अस्वस्थता निर्देशांक’ वाढला आहे. सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये कोरड्या हवेमुळे तापमान 38 अंशांपर्यंत गेले असले, तरी कोल्हापुरात वा-याचा वेग मंदावल्याने (ताशी 6 कि. मी.) शरीराला येणारा धाम सुकत नाही, परिणामी जास्त उकाडा जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही स्थिती स्थानिक वातावरणीय बदलांचे निदर्शक आहे.
युवराज मोटे, भूगोल तज्ज्ञ

Satara News : जिल्हयात पेट्रोल डिझेलबाबत नागरिकांना दिलासा ; काय म्हणाले शंभूराज देसाई ?

कोल्हापुरात आर्द्रतेमुळे उकाड्यात झाली वाढ
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, येथे कमाल तापमान 36 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 71 ते 78 टक्क्यांपर्यंत नोंदवले गेले आहे. कोल्हापुरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असले, तरी वाऱ्याचा वेग ताशी 6 किमी इतका संथ असल्याने हवेतील उकाडा अधिक जाणवणार आहे.

सोलापूर ‘हॉट’, तर पुणे साताऱ्यातही दाहकता
पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्येही उन्हाची तीव्रता अधिक आहे:
सोलापूर विभागात सोलापूर जिल्हा सर्वाधिक तप्त असून, येथे तापमान 38 अंशांवर गेले आहे. येथील किमान तापमानही 25 अंश राहिल्याने रात्रीचा उकाडा कायम आहे. सांगली व अहिल्यानगर जिल्ह्यांत पारा 37अंशांवर स्थिरावला आहे. कोल्हापूरप्रमाणेच पुणे आणि सातारा जिल्ह्यांत 36अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

वाऱ्याची दिशा आणि आर्द्रतेचा खेळ सुरू
सपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग ताशी 12 ते 14 कि.मी. इतका अधिक आहे, तर पुणे आणि सांगलीत तो 9ते 10कि. मी. आहे. दुपारच्या वेळी सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये कोरडे हवामान (आर्द्रता 13-14 टक्के) असेल, तर उर्वरित जिल्ह्यांत 32 ते 37 टक्के आर्द्रता राहील.

Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

Web Title: Kolhapur news western maharashtra heats up kolhapurs mercury hits 36 degrees if you go out you will sweat profusely

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.