Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ…

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाखांची मागणी अन् नवविवाहितेचा अमानुष छळ! अर्ध्या चपातीवर तीन दिवस उपाशी ठेवून मंगळसूत्रही काढून घेतले; इचलकरंजीत पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 22, 2026 | 04:43 PM
Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ...

Domestic Case: व्यवसायासाठी २० लाख आण अन् अर्ध्या चपातीवर ३ दिवस उपाशी राहा! नवविवाहितेचा अमानुष छळ...

Follow Us
Follow Us:
  • व्यवसायासाठी २० लाखांच्या मागणीवरून नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
  • पैशांसाठी मारहाण, तीन दिवस उपाशी ठेवणे आणि दागिने व मंगळसूत्र काढून घराबाहेर हाकलले
  • पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
Domestic Case: कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका नवविवाहितेचा अमानुष छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित नवविवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Rabies Death: मला जेवायला द्या, पाणी द्या, मला घरी न्या… विलगीकरण कक्षातून चिमुकलीची आर्त हाक अन् अखेर मृत्यूशी झुंज अपयशी!

उपाशी ठेवून मारहाण; मंगळसूत्र काढून घरातून हाकलले

मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींकडून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेने माहेरून २० लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली जात होती. पैशांची ही मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला सतत टोमणे मारणे, उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू करण्यात आले. आरोपींनी अवघ्या अर्ध्या चपातीवर तब्बल तीन दिवस विवाहितेला उपाशी ठेवल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रही काढून घेतले आणि तिला घराबाहेर हाकलून दिल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा: Firing News: खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या कारवर गोळीबार! अवघ्या ८ तासांत गुन्ह्याचा उलगडा

सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; तपास सुरू

सासरच्या या अमानुष जाचाला कंटाळून अखेर पीडित नवविवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अभिषेक वासुदेव याच्यासह बाजीराव वासुदेव, शर्मिला वासुदेव, राजू हजारे, सायली हजारे आणि अभिजीत वासुदेव यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इचलकरंजीतील ही घटना कोठे घडली?

    Ans: ही घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: पीडित नवविवाहितेने तक्रारीत कोणते आरोप केले आहेत?

    Ans: नवीन व्यवसायासाठी माहेरून २० लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने मारहाण करणे, अर्ध्या चपातीवर तीन दिवस उपाशी ठेवणे, दागिने व मंगळसूत्र काढून घेणे आणि घराबाहेर हाकलून देणे असे आरोप पीडितेने केले आहेत.

  • Que: पोलिसांनी कोणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: शिवाजीनगर पोलिसांनी पती अभिषेक वासुदेवसह बाजीराव वासुदेव, शर्मिला वासुदेव, राजू हजारे, सायली हजारे आणि अभिजीत वासुदेव या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Domestic case ichalkaranji kolhapur newlywed torture 20 lakh shivajinagar police sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • crime news
  • Domestic Violence
  • Ichalkaranji News
  • kolhapur

संबंधित बातम्या

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा
1

जावयाच्या छातीत भाला खुपसून निर्घृण खून; सासरा, सासू, पत्नी आणि दोन मेहुण्यांना जन्मठेपेची शिक्षा

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
2

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
3

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका
4

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.