Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smart Ration Card : कागदी रेशन कार्ड इतिहास जमा! महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची होणार एन्ट्री, कधी मिळणार?

महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने आता पारंपरिक कागदी रेशन कार्ड ऐवजी 'स्मार्ट रेशन कार्ड' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 12:22 PM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • कागदी रेशन कार्ड इतिहास जमा!
  • महाराष्ट्रात स्मार्ट रेशन कार्डची होणार एन्ट्री
  • कसं असेल नव्या कार्डची प्रणाली?
Smart Ration Card: रेशनिंग व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कागदी रेशन कार्ड कालबाह्य होऊन त्याची जागा क्यूआर कोड असलेलं स्मार्ट रेशन कार्ड घेणार आहे. राज्यातील रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असलेली सुधारित प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. नेमकी काय असेल प्रोसेस? कधीपासून होणार लागून जाणून घेऊयात.

कुक्कुटपालन करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! Poultry व्यवसायातील कमाई वाढणार; बनणार सर्वात फायदेशीर बिझनेस

टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू

नवीन व्यवस्था टप्प्याटप्प्याने राज्यभर लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारी निर्णयानुसार, आता नव्याने जे लोकं रेशन कार्डसाठी अर्ज करतील त्या सर्वांना थेट स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे. सध्या वापरात असलेली कागदी रेशन कार्डेही टप्प्याटप्प्याने स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येईल. या प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांना हा बदल करुन मिळणार आहे.

नव्या रेशनकार्डची काय खासियत?

नव्या डिजीटल प्रणालीवर चालणाऱ्या रेशनकार्डमध्ये खास आहे तो म्हणजे क्यूआर कोड. नवीन स्मार्ट रेशन कार्डावर प्रत्येक लाभार्थ्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोड देण्यात येणार आहे. आपण रेशन दुकानात जाताच हा कोड स्कॅन केला की लाभार्थ्याची संपूर्ण माहिती काही क्षणांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ओळख पडताळणी आणि तपासणी अधिक सुलभ आणि अचूक करता येणार आहे. तसेच प्रत्येक व्यवहाराची नोंद आता डिजिटल स्वरुपात ठेवली जाणार आहे. यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार आहे. याच बरोबर आणखी मोठा फायदा तो म्हणजे क्युआर कोड असल्यामुळे आपल्याला पाहिजे तेव्हा मोबाईलचा वापर करुन रेशन कार्ड संबंधित माहिती मिळवू शकतो. त्यामुळे स्वतःचा डेटा तपासणं, वितरणाबाबत सगळा तपशील जाणून घेईल आणि काही अडचण असल्यास त्यासाठी तक्रार करणं देखील सोपं आहे.

कसं असेल हे कार्ड?

पूर्वीचं रेशनकार्ड हे कागदी पुस्तकी स्वरुपात होतं. आता डिजीटल इंडियाच्या युगात स्मार्ट रेशन कार्ड प्लास्टिकपासून तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे हे कागदी कार्डांपेक्षा अधिक टिकाऊ असणार आहेत. कागदावेळी होणाऱ्या समस्या फाटणे, भिजणे किंवा खराब होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. शिवाय डिजिटल पडताळणीमुळे रेशन वितरणासाठी लागणारा वेळही कमी होण्याची शक्यता आहे.

या सगळ्या नवीन प्रणालीमुळे सगळा बनाव बनावट रेशन कार्ड ओळखणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल पडताळणी आणि ऑनलाइन नोंदीच्या माध्यमातून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ना ग्राहक येणार, ना काउंटर लागणार! तरीही लाखो रुपयांची कमाई; तुम्हीही सुरु करु शकता Blinkit, Zepto चा ‘डार्क स्टोअर’ बिझनेस

Web Title: Paper ration cards become the past smart ration cards set to be introduced in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Business News
  • digital
  • Digital news
  • Government
  • maharashtra
  • Marathi News
  • Ration Card
  • Ration card News

संबंधित बातम्या

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
1

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
2

Sugarcane Farmers Protest : दिल्लीतील बैठक निष्फळ; आज महाराष्ट्र-कर्नाटक महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन
3

Mumbai News : धम्मचक्र दिनानिमित्त शिंदेंच्या शिवसेनेची ‘धम्म समता जागृती बाईक रॅली; १४ ऑक्टोबरला मुंबईत आयोजन

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
4

Mira Road News : राज ठाकरेंच्या घोषणेनंतर मनसे आक्रमक; मीरा रोडमध्ये सह्यांची मोहीम, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.