• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Rebellion In Mahavikas Aghadi In Ichalkaranji Former Mla Ashok Jambhle Fill Form For Election 2024

महायुतीनंतर ‘मविआ’समोर बंडखोरी राखण्याचे आव्हान; वरिष्ठ नेत्यांना इचलकरंजीत करावी लागणार कसरत! 

इचलकरंजीच्या राजकारणात आमदार प्रकाश आवाडे हे मुरब्बी आहेत. त्यांना या मतदारसंघातील विजयाची गणिते चांगली ज्ञात आहेत. डाव प्रतिडाव माहीत असल्याने विरोधकांना खिडींत गाठून नामोहरण करण्याची संधी ते सोडणार नाहीत. 

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2024 | 02:35 AM
महायुतीनंतर 'मविआ'समोर बंडखोरी राखण्याचे आव्हान; वरिष्ठ नेत्यांना इचलकरंजीत करावी लागणार कसरत! 

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बंडखोरी (फोटो- टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इचलकरंजी/राजेंद्र पाटील:  राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर केल्या आहेत. उमेदवारी न मिळाल्याने महायुतीमध्ये सुरुवातीला नाराजी सत्र सुरू झाले, आता याचे लोण  महाविकास आघाडीमध्ये पहावयास मिळत आहेत. राहुल आवाडे यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर आवाडे विरोधक एकवटले आणि महायुतीतच बंडखोरीची ठिणगी पडली. आता मदन कारंडे यांच्या उमेदवारीनंतर माजी आमदार अशोक जांभळे गट आक्रमक पवित्रा घेत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी धनत्रयोदिनी युती आणि आघाडीतील बंडखोर अर्ज दाखल करणार आहेत.

महायुतीने राहुल आवाडे यांची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य खऱ्या अर्थाने सुरू झाले. माजी आमदार सुरेश हाळवणकर गटाने आवाडेंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. निष्ठावंत विरुद्ध उपरा उमेदवार अशी तुलना करीत आवाडेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला गेला. नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी आणि हळवणकर आवाडे यांच्यातील मनोमिलन घडविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इचलकरंजीत यावे लागले. बावनकुळेंच्या मध्यस्थीनंतर हळवणकर गट रिचार्ज झाला, मात्र भाजपाचे  माजी  जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी पदाचा राजीनामा देऊन आवाडे विरोधकांना एकत्रित करून विरोधकांची मोट बांधली जाते का याची चाचपणी सुरू केली. अशा वातावरणात शिवसेना (शिंदे गट ) चे जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांनी निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगत महायुतीला धक्का दिला हे वादळ अवघ्या चार दिवसात संपले मुख्यमंत्री शिंदे यांनी रविंद्र माने यांना पुनर्वसनाचा शब्द देऊन महायुतीसोबत राहण्याचा सल्ला दिला.

आता राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पदाचा राजीनामा देत त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता जांभळे गटाने ही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती बरोबरच महाविकास आघाडीतील नाराज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे येणार आहेत. या मतदारसंघातील खरी लढत ही दुरंगीच असणार आहे. महायुतीचे राहुल आवाडे विरुद्ध महाविकास आघाडीचे मदन कारंडे अशी ही लढत होणार असली तरी महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांची मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

हेही वाचा: Maharashtra Election: महायुतीत अंतर्गत बंडखोरीची ठिणगी; इचलकरंजीत ‘या’ उमेदवाराच्या विरोधात अंतर्गत कुरघोड्या सुरुच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर कारंडे व चोपडे यांच्यातही दरी निर्माण झाली. स्थानिक पातळीवर एकत्र काम करणाऱ्या कारंडे व चोपडे यांनी या निवडणूकीत विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतील कारंडे यांना मिळणाऱ्या  मताच्या विभागणीसाठी चोपडे यांची उमेदवारी पुढे आल्याची चर्चा दबक्या आवाजात  सुरू झाली आहे .
इचलकरंजीच्या राजकारणात आमदार प्रकाश आवाडे हे मुरब्बी आहेत. त्यांना या मतदारसंघातील विजयाची गणिते चांगली ज्ञात आहेत. डाव प्रतिडाव माहीत असल्याने विरोधकांना खिडींत गाठून नामोहरण करण्याची संधी ते सोडणार नाहीत. पुत्र प्रेमापोटी  कोणताही राजकीय डाव आवाडे खेळू शकतात.  दुरंगी लढतीत दगाफटका होऊ नये  यासाठी मताची विभागणी व्हावी आणि त्याचा फायदा महायुतीला मिळावा यासाठी प्रकाश आवाडें  काहींना मैदानात उतरण्यासाठी मनधरणी करू शकतात अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

Web Title: Rebellion in mahavikas aghadi in ichalkaranji former mla ashok jambhle fill form for election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • Ichalkaranji
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली
1

Maharashtra politics : धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला; महायुतीत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय समीकरणे ढवळून निघाली

Dharashiv News: महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट
2

Dharashiv News: महायुतीच्या विजयानंतर राजकीय हालचालींना वेग; पालकमंत्र्यांची मुंबईत सदिच्छा भेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

NEP vs SCO, T20 World Cup 2026 : नेपाळचा स्कॉटलंडला दणका! 7 विकेट्सने केले पराभूत; दीपेंद्र सिंग ऐरीची विजयी खेळी 

Feb 17, 2026 | 10:28 PM
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! ८ गडी बाद करत निवड समितीचे टेन्शन वाढवलं; पुनरागमनासाठी ठोकला दावा

Feb 17, 2026 | 10:02 PM
“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

“मुंबई आणि महाराष्ट्र जागतिक आर्थिक…”; ‘या’ परिषदेत काय म्हणाले Devendra Fadnavis यांचे भाष्य

Feb 17, 2026 | 09:37 PM
“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

“हिंदूंनी ३ मुलांना जन्म द्यावा, ‘घरवापसी’चा वेग वाढवा”; लखनौमध्ये सरसंघचालक Mohan Bhagwat यांचे मोठे विधान

Feb 17, 2026 | 09:32 PM
ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

Feb 17, 2026 | 09:11 PM
पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

पाकिस्तानला मोठा झटका! IPL नंतरची सर्वात लोकप्रिय लीग भारतात खेळवण्याची शक्यता; BCCI सोबत चर्चा सुरू

Feb 17, 2026 | 09:05 PM
१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

Feb 17, 2026 | 08:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.